SRH vs PBKS : प्रभसिमरन सिंहची तडाखेदार खेळी, हैदराबादला 215 रन्सचं टार्गेट

| Updated on: May 19, 2024 | 5:29 PM

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings 1st Innings Highlights In Marathi : सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांचा या 17 व्या हंगामामधील अखेरचा सामना आहे. पंजाबने अखेरच्या सामन्यात 200 पार मजल मारली.

SRH vs PBKS : प्रभसिमरन सिंहची तडाखेदार खेळी, हैदराबादला 215 रन्सचं टार्गेट
Prabhsimran Singh srh vs pbks
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

अथर्व तायडे आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने केलेली शानदार भागीदारी आणि त्यानतंर रायली रुसो याने केलेल्या 49 धावांच्या जोरावर पंजाब किंग्सने आपल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं आहे. पंजाब किंग्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 214 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून प्रभसिमरन सिंह याने सर्वाधिक धावा केल्या. तर पंजाबकडून टी नटराजन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि अथर्व तायडे या सलामी जोडीने 97 धावाची भागीदारी केली. त्यानंतर अथर्व तायडे 27 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 46 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर प्रभसिमरन आणि रायली रुसो या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 54 धावा जोडल्या. पंजाबला 151 धावांवर दुसरा झटका लागला. प्रभसिमरन 45 बॉलमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. त्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. शशांक सिंह 2 धावांवर रन आऊट झाला.

रायली रुरसो दुर्देवी ठरला. रायलीचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. रायलीने 24 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 49 धावा केल्या. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2-2 धावा केल्या. तर त्यानंतर कॅप्टन जितेश शर्मा याने शिवम सिंह याच्या सोबतीने सहाव्या विकेटसाठी 11 चेंडूत 27 धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यामुळे पंजाबला 200 पार पोहचता आलं. जितेश शर्मा याने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने नाबाद 32 धावांची खेळी केली. तर शिवम सिंह 2 धावांवर नाबाद परतला. तर नटराजन व्यतिरिक्त हैदराबादकडून विजयकांत वैशाखनाथ आणि कॅप्टन पॅट कमिन्स या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

हैदराबादसमोर 215 धावांचं आव्हान

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : जितेश शर्मा (कॅप्टन आणि विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, रायली रोसो, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, हर्षल पटेल आणि राहुल चहर.