आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अखेरच्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांचा या हंगामामधील साखळी फेरीतील अखेरचा सामना आहे. तसेच दोन्ही संघांची ही याच हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादची धुरा आहे. तर अमरावतीकर जितेश शर्मा याला सॅम करन याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. पंजाबने टॉस जिंकला. कॅप्टन जितेशने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
पंजाबच्या गोटातील बरेचसे विदेशी खेळाडू हे मायदेशी परतले आहेत. त्यामुळे फक्त पंजाबच्या गोटात 2 विदेशी खेळाडू आहेत. त्या 2 पैकी फक्त रायली रुसो हा प्लेईंग ईलेव्हनमधील एकमेव विदेशी खेळाडू आहेत. तर सनरायजर्स हैदराबादने एकमेव बदल केला आहे. हैदराबादने प्लेईंग ईलेव्हनमध्ये राहुल त्रिपाठी याचा समावेश केला आहे.
हैदराबाद विरुद्ध पंजाब दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी उभयसंघांमध्ये 9 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा हैदराबादने हा सामना अवघ्या 2 धावांनी जिंकला होता. त्यामुळे आता पंजाब हा सामना जिंकून मागील पराभवाचा वचपा घेणार की हैदराबाद विजय मिळवून दुसऱ्या स्थानासाठी दावा ठोकणार, याकडे लक्ष असणार आहे.
दरम्यान आरसीबीने शनिवारी 18 मे रोजी सीएसकेचा पराभव केला. आरसीबी यासह प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. त्याआधी हैदराबाद, राजस्थान आणि कोलकाता या संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. मात्र आता हैदराबाद आणि राजस्थान दोघांमध्ये दुसऱ्या स्थानासाठी लढाई आहे. साखळी फेरीतील आव्हान पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर संपवल्यास प्लेऑफमध्ये फायनलमध्ये पोहचण्यासाठी एकूण 2 संधी मिळतात.
राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी 13 सामने खेळले आहेत. हैदराबादचा पंजाब विरुद्धचा हा 14 वा सामना आहे. हैदराबादने हा सामना जिंकला तर, ते 17 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी पोहचतील. तसेच हैदराबादने हा सामना जिंकल्यास राजस्थानला दुसरं स्थान कायम राखण्यासाठी संध्याकाळी होणाऱ्या सामन्यात केकेआर विरुद्ध कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागेल. त्यामुळे आता कोण यशस्वी ठरतं, हे दोन्ही सामने झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : जितेश शर्मा (कॅप्टन आणि विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, रायली रोसो, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, हर्षल पटेल आणि राहुल चहर.