आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादची सूत्रं आहेत. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. राजस्थान हा सामना जिंकून प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करण्याची संधी आहे. तर हैदराबादचा टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा हा 10 वा सामना आहे. राजस्थानने 9 पैकी 8 सामने जिंकलेत. राजस्थान 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादने 9 पैकी 5 सामने जिंकलेत. हैदराबाद पाचव्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे आता या सामन्यात उभयसंघात चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना गुरुवारी 2 मे रोजी होणार आहे.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन) हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन आणि आकाश महाराज सिंग.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, तनुष कोटियन, नवदीप सैनी, केशव महाराज, नांद्रे बर्गर, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक आणि कुणाल सिंग राठोड.