आयपीएलच्या 17 व्या मोसमातील क्वालिफायर 2 या निर्णायक सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं आहे. सनरायजर्स हैदराबादने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी साखळी फेरीत विस्फोटक फलंदाजानी प्रतिस्पर्धी संघात एक दहशत तयार केली होती. मात्र निर्णायक सामन्यात काही अपवाद वगळले तर राजस्थानच्या गोलंदाजांसमोर सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज निष्प्रभ ठरले. हैदराबादकडून एकट्या हेन्रिक क्लासेन याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तर राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
हेन्रिक क्लासेन याने 34 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. राहुल त्रिपाठी याने 15 चेंडूत 2 सिक्स आणि 5 फोरसह टॉप गिअरमध्ये 37 रन्स केल्या. ट्रेव्हिल हेडने साखळी फेरीत अनेक विक्रम केले. मात्र त्याला या सामन्यात धावांसाठी संघर्ष करावा लागला. हेडने 28 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. शाहबाद अहमद याने 18 आणि अभिषेक शर्माने 12 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना काही खास करता आलं नाही. राजस्थानकडून आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट या दोघांच्या प्रत्येकी 3 विकेट्स व्यतिरिक्त संदीप शर्मा याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
दरम्यान आता राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये पोहचायचं असेल तर 176 धावा कराव्या लागतील. तर हैदराबादला अंतिम फेरीचं तिकीट हवं असेल, तर या 176 धावांचा बचाव करावा लागेल. आता या दोघांपैकी कोणती टीम अंतिम फेरीत कोलकाता विरुद्ध भिडणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
फायनलमध्ये कोण धडकणार?
Innings Break!
A competitive 🎯 of 1️⃣7️⃣6️⃣ for a place in the #Final ‼️
Which way is it going folks – 🩷 or 🧡
Chase starts 🔜
Scorecard ▶️ https://t.co/Oulcd2G2zx#TATAIPL | #Qualifier2 | #SRHvRR | #TheFinalCall pic.twitter.com/lt9pGK5kLh
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2024
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.
हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर : उमरान मलिक, सनवीर सिंह, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि शाहबाज अहमद.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.
राजस्थान इम्पॅक्ट प्लेअर: शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्गर, शुभम दुबे, डोनोवन फरेरा आणि कुलदीप सेन.