आयपीएल 2024 स्पर्धेत जयपराजयासह ऑरेंज कॅपची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करतो याबाबत आतापासून चर्चा रंगली आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच कोणता खेळाडू फॉर्मात आहे याचा अंदाज बांधला जात आहे. तसं पाहिलं तर कोलकात्याच्या आंद्रे रसेलने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आंद्रे रसेलने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अवघ्या 25 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 64 धावा केल्या. यावेळी रसेलचा स्ट्राईक रेट हा 256 चा होता. त्यामुळे त्याच्या आसपास पोहोचणं पहिल्या फेरीत कठीण असल्याचं दिसत आहे. रविवारी दोन सामने झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील पाच सामने पार पडतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध बंगळुरुच्या अनुज रावतने 48 धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने 192 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्सच्या सॅम करने 47 चेंडूत 63 धावा केल्या. 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदत घेत 134 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आणि ऑरेंज कॅप मिळवली. मात्र हा मान काही तासातच आंद्रे रसेलकडे गेला. त्याने सॅम करनपेक्षा 1 धाव अधिक केली आणि मान मिळवला.
प्लेयर्स | सामने | स्ट्राईक रेट | रन्स |
---|---|---|---|
विराट कोहली | 4 | 140.97 | 203 |
रियान पराग | 3 | 160.17 | 181 |
हेनरिक क्लासेन | 3 | 219.73 | 167 |
शुबमन गिल | 4 | 159.22 | 164 |
साई सुदर्शन | 4 | 160 | 128.00 |
हेन्रिक क्लासेनचीही एक धाव कमी पडली. पण सॅम करनच्या तुलनेत स्ट्राईक रेट जास्त असल्याने दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. क्लासेनचा स्ट्राईक रेंट 217.24 इतका आहे. तर सॅम करनचा स्ट्राईक रेट तितक्याच धावांसह 192 इतका आहे. आता ऑरेंज कॅप काही तास त्याच्याकडे राहते की जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात कोणता खेळाडू मान मिळवतो याची उत्सुकता वाढली आहे.
डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 3 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. 2015, 2017, 2019 साली या कॅपचा मानकरी ठरला आहे. तर वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने ही कॅप दोनदा मिळवली आहे. 2011, 2012 मध्ये त्याने ही कॅप मिळवली आहे. तर शेन मार्शने (2008), मॅथ्यू हेडनने (2009), सचिन तेंडुलकरने (2010), माईक हसीने (2013), रॉबिन उथप्पाने (2014), विराट कोहलीने (2016), केन विल्यमसनने (2018), केएल राहुलने (2020), ऋतुराज गायकवाडने (2021), जोस बटलरने (2022) आणि शुबमन गिलने (2023) मध्ये ही कॅप मिळवली आहे.