SRH vs RR : सनरायझर्स हैदराबादचं राजस्थान रॉयल्सपुढे 287 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

| Updated on: Mar 23, 2025 | 5:31 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाचं वादळ घोंगावलं. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने आक्रमक सुरुवात केली. तर इशान किशनने त्यात भर घातली.

SRH vs RR : सनरायझर्स हैदराबादचं राजस्थान रॉयल्सपुढे 287 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
सनरायझर्स हैदराबाद
Image Credit source: Sunrisers Hydrabad Twitter
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि इशान शर्माने आक्रमक खेळीचं प्रदर्शन केलं. पॉवर प्लेच्या सहा षटकात 1 गडी बाद 94 धावा केल्या.  ट्रेव्हिस हेडने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची पिसं काढली.  31 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या.  तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर हेटमायरने त्याला झेल पकडला आणि तंबूत पाठवलं. हेडची विकेट पडल्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांचा जीव भांड्यात पडला.  पण त्यानंतर इशान किशन आणि नितीश राणाने तशीच आक्रमकता ठेवली. इशान किशनने आक्रमकता दाखवत 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकी खेळी दरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. सनरायझर्स हैदराबादला नितीश कुमार रेड्डीच्या रुपाने तिसरा धक्का बसला. त्याने 15 चेंडूत 30 धावांची खेळी केली. त्यान चार चौकार आणि एक षटकार मारला. हेनरीक क्लासेन आणि इशान किशनने त्यानंतर धावांची गाडी पुढे नेली. क्लासेन आणि इशांत यांच्यात 56 धावांची भागीदारी झाली. क्लासेने 14 चेंडूत 34 धावा करून बाद झाला.

इशान किशनने 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. इशान किशनने 45 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 100 धावा केल्या. यासह स्पर्धेतील पहिलं शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीमुळे या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्येपर्यंत सनरायझर्स हैदराबादने मजल मारली.  सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 286 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं आहे. इशान किशनने नाबाद 106 धावांची खेळी केली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.