आगामी IPL 2025 चा लिलाव अजुन काही पार पडला नाही. येत्या वर्षी मेगा लिलाव असल्यामुळे फ्रँचायसींनी खेळाडू रिटेन करायचे आहेत. याआधी बीसीसीआयने सर्व फ्रँचायसींची बैठक बोलावली होती. त्यावेळी मात्र खेळाडूंना रिटेन करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले नाही. त्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. आता रिटेन्शन पॉलिसीचे नियम काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच राईट टू कार्डची एन्ट्री होणार असल्याचं दिसत आहे.
आयपीएल रिटेन्शन पॉलिसीमध्ये एका नियमाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तो नियम म्हणजे बीसीसीआय आता निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनकॅप घोषित करण्याची शक्यता आहे. याआधी अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू अनकॅप्ड होते, पण आता निवृत्त झालेले खेळाडूही अनकॅप्ड असतील. त्यामुळे महेंद्र सिंहो धोनीहा सुद्धा या यादीमध्ये जावू शकतो. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नवीन पॉलिसी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पॉलिसीमध्ये राईट कार्डची समावेश असू शकतो.
आयपीएल लिलावात RTM म्हणजेच राईट टू मॅच कार्डचाही वापर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. जी बीसीसीआयने 2014 च्या आयपीएलमध्ये आणले होते, पण नंतर बंद करण्यात आले. मात्र यावेळी अनेक फ्रँचायसींनी ते कार्ड पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली. आता बीसीसीआय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या हंगामातील लिलाव डिसेंबरमध्येच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व फ्रँचायसींना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे.
आयपीएलमध्ये लिलावादरम्यान ‘राइट-टू-मॅच’ चा वापर करता येतो. कोणत्याही टीमच्या खेळाडूला दुसऱ्या कोणत्या फ्रँचासयीने खरेदी केले. तर त्या खेळाडूला तेवढ्याच किंमतीत रिटन केलेली टीम ‘राइट-टू-मॅच’ कार्डचा वापरून माघारी घेऊ शकते. प्रत्येक टीमला लिलावावेळी पाचवेळा एक ‘राइट-टू-मॅच’ कार्ड वापरता येऊ शकतं.