DC vs LSG Confirmed Playing XI, IPL 2025 : सलामीच्या सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर, नक्की कारण काय?

| Updated on: Mar 24, 2025 | 8:17 PM

Delhi Capitals vs Lucknow Super Giants Confirmed Playing XI in Marathi : दिल्ली विरुद्ध लखनौ यांच्यात विशाखापट्टणम येथे सामना आयोजित करण्यात आला आहे. मात्र या सामन्यातून अनुभवी फलंदाजांला माघार घ्यावी लागली आहे.

DC vs LSG Confirmed Playing XI, IPL 2025 : सलामीच्या सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर, नक्की कारण काय?
Axar Patel and K L Rahul
Image Credit source: TV9 Bharatvarsh
Follow us on

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीने टॉस जिंकला. कर्णधार अक्षर पटेल याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला. या स्पर्धेला सुरुवात होऊन अवघे 2 दिवस झाले आहेत. लखनौ आणि दिल्लीचा हा या मोहिमेतील पहिला सामना आहे. मात्र त्याआधीच दिल्लीच्या खेळाडूला घरी परतावं लागलं आहे. अनुभवी फलंदाज आणि विकेटकीपर केएल राहुल याला माघार घ्यावी लागली आहे. माघार घेण्याचं कारण हे दुखापत नाही. राहुलने माघार घेण्यामागे आनंदाची बातमी आहे. केएल लवकरच बाबा होणार आहे. त्यामुळे केएल मुंबईला परतला आहे.

केएल माघारी

मिळालेल्या माहितीनुसार, केएल दिल्ली विरुद्ध लखनौ सामन्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबईला परतला. केएल 3 दिवसांपूर्वी लखनऊ टीमसह विशाखापट्टणम येथे जोडला गेला होता. मात्र केएल खेळणार की नाही? याबाबत काहीच निश्चित नव्हतं. तसेच कर्णधार अक्षर पटेल याने सामन्याच्या एक दिवसआधी पत्रकार परिषदेत केएल खेळणार की नाही? याबाबत माहित नसल्याचं सांगितलं होतं.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आथिया शेट्टी (केएलची पत्नी) कोणत्याही क्षणी आई होऊ शकते, अशी माहिती केएलला रविवारी 23 मार्च रोजी मिळाली. केएलने यानंतर टीम मॅनेजमेंटकडे परवानगी घेतली. केएल ग्रीन सिनल मिळाल्यानंतर मुंबईला परतला. केएलने अवघ्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आथियासोबतचे खास फोटो पोस्ट केले होते.

आथिया-केएल आई-बाबा होणार

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर आणि रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.