आयपीएल 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येत आहे. दोन्ही संघ तूल्यबळ आहेत. मेगा लिलावानंतर दोन्ही संघात बदल झाला आहे. राजस्थानच्या तुलनेत हैदराबाद संघात स्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे आक्रमक फलंदाजी पाहण्याची अनुभूती प्रेक्षकांना मिळू शकते. दरम्यान, नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार रियान परागने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रियान पराग म्हणाला, सुरुवातीला गोलंदाजी करू. खेळपट्टी कोरडी आहे, त्यामुळे नंतर आपल्याला त्याचा अनुभव येईल. 17 वर्षांच्या वयातच इथे सुरुवात केली. मोठी भूमिका बजावत आहे, खूप उत्साहित आहे. संजूला इम्पॅक्ट नियम मदत करतो. इतर तीन विदेशी खेळाडू थीक्षाना, जोफ्रा आणि फारुकी असतील. चांगली सुरुवात करणे नेहमीच चांगले असते, आम्ही खूप सराव केला आहे.
कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, मैदानात परत येणे खूप छान आहे. संघाचा गाभा तोच आहे, प्रशिक्षक आणि स्टाफ तोच आहे. प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी महत्त्वाची आहे असे वाटत नाही. सध्या खूप उकाडा आहे, म्हणून दुसऱ्यांदा गोलंदाजी करण्यास हरकत नाही. गेल्या हंगामाचा फॉर्म कायम ठेवला तर छान होईल. आम्ही नेहमीच आमच्या खेळाडूंना स्वातंत्र्याने खेळण्यास प्रोत्साहित करतो. अभि आणि हेडी गेल्या वर्षीसारखी सुरूवात ठेवण्याची आशा आहे आणि नितीश आणि क्लासेन देखील तिथे आहेत. इशान किशन आणि अभिनव मनोहर हे पदार्पण करतील.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.