IPL 2025 CSK vs MI Live Streaming : चेन्नई विरुद्ध मुंबई आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

| Updated on: Mar 22, 2025 | 11:20 PM

Chennai super kings vs Mumbai indians Live Streaming : रविवारी 23 मार्चला आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिलं डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात सामना होणार आहे.

IPL 2025 CSK vs MI Live Streaming : चेन्नई विरुद्ध मुंबई आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Rohit Sharma and M S Dhoni
Image Credit source: AFP
Follow us on

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) तिसऱ्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील 2 यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिला सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या हंगामात विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.

चेन्नई विरुद्ध मुंबई सामना केव्हा?

चेन्नई विरुद्ध मुंबई सामना रविवारी 23 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

चेन्नई विरुद्ध मुंबई सामना कुठे?

चेन्नई विरुद्ध मुंबई सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

चेन्नई विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

चेन्नई विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

चेन्नई विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहता येईल.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ (विकेटकीपर), मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, रीस टोपली, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान, कृष्णन श्रीजीत, कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, राजा बावा, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, अश्वनी कुमार, सत्यनारायण राजू आणि विघ्नेश पुथूर.