आयपीएलच्या 18 व्या मोसमाला दणक्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. तर चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आमनसामना होणार आहे. दोन्ही संघांचे नवे कर्णधार आहेत. अक्षर पटेल हा पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे. अक्षरकडे दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची धुरा आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघात विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत सर्व महत्त्वाची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊयात.
दिल्ली विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना सोमवारी 24 मार्च रोजी होणार आहे.
दिल्ली विरुद्ध लखनौ सामना डॉक्टर वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे होणार आहे.
दिल्ली विरुद्ध लखनौ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
दिल्ली विरुद्ध लखनौ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओ-हॉटस्टार एपवर लाईव्ह मॅच पाहता येईल.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
दिल्ली कॅपिटल्स संघ : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, विपराज निगम आणि माधव तिवारी.