KKR vs RCB Toss : आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, केकेआरची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Mar 22, 2025 | 7:42 PM

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Toss IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिला टॉस आरसीबीने जिंकला आहे. कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

KKR vs RCB Toss : आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, केकेआरची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
KKR vs RCB Toss IPL 2025
Image Credit source: Social Media
Follow us on

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) सलामीच्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी रंगारंग कार्यक्रमानंतर 7 वाजून 15 मिनिटांनी टॉस झाला. आरसीबीने टॉस जिंकला. कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता केकेआर घरच्या मैदानात पहिल्या डावात किती धावांपर्यंत मजल मारते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

17 वर्षानंतर पुन्हा आमनेसामने

कोलकाता आणि बंगळुरु दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेत हंगामातील सलामीच्या सामन्यात 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा आमेनसामने आहेत. याआधी या स्पर्धेतील पहिल्याच मोसमातील पहिल्याच सामन्यात (IPL 2008) दोन्ही संघ आमेनसामने होते. तेव्हा केकेआरने बंगळुरुवर एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे आता बंगळुरु 17 वर्षांनंतर या पराभवाचा वचपा घेणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

कोलकाता विरुद्ध बंगळुरु दोन्ही संघांची आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आमनेसामने येण्याची ही 35 वी वेळ आहे. याआधी उभयसंघात 34 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआर या 34 पैकी सर्वाधिक सामन्यांत वरचढ राहिली आहे. केकेआरने 34 मधून 20 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 14 वेळा विजय मिळवला आहे.

बंगळुरुने टॉस जिंकला

रंगारंग कार्यक्रम

दरम्यान टॉसआधी संध्याकाळी 6 वाजता ओपनिंग सेरेमनीला सुरुवात झाली. गायिका श्रेया घोषाल अनेक गाणी गाऊन उपस्थितांची मनं जिंकली. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हीने नृत्याने चाहत्यांचे मनोरंजन केलं. तसेच गायक करण औजला याने त्याच्या हिट गाण्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड आणि यश दयाल.