भारतीय क्रीडा वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी आयपीएल 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) सर्व 10 फ्रँचायजींनी रिटेन अर्थात राखून ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. त्यानंतर सर्व क्रिकेटपटूंना आणि चाहत्यांना आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन कुठे होणार? याची प्रतिक्षा लागून होती. याची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने सोशल मीडियावरुन मेगा ऑक्शन कुठे आणि कधी होणार? याबाबतची अखेर घोषणा केली आहे.
आयपीएल 2025 मेगा ऑक्शन हे एकूण 2 दिवस चालणार आहे. तसेच यंदा परदेशात ऑक्शन होणार आहे. मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे पार पडणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. तसेच या मेगा ऑक्शन दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु असणार आहे. या सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंचं भवितव्य निश्चित होणार आहे. कोणता खेळाडू महागडा ठरणार? कोण अनसोल्ड राहणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ही रविवारी आणि सोमवारी मिळणार आहेत.
आयपीएल ऑक्शनचं परदेशात आयोजन करण्याची ही स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी वेळ आहे. यंदाचा मेगा ऑक्शन अबादी अल जोहर एरिना येथे होणार आहे. हा मेगा ऑक्शन हॉटेल शांगरी-ला येथे होणार आहे. तर याआधी आयपीएल 2024 साठी मिनी ऑक्शन हे दुबईत आयोजित करण्यात आलं होतं. तेव्हा फक्त 1 दिवसातच हे ऑक्शन पार पडलं होतं. मात्र यंदा मेगा ऑक्शन होणार असल्याने 2 दिवस लागणार आहेत.
2०4 खेळाडूंसाठी 2 दिवस रंगणार मेगा ऑक्शनचा थरार
✍️ 1574 Player Registrations
🧢 320 capped players, 1,224 uncapped players, & 30 players from Associate Nations
🎰 204 slots up for grabs
🗓️ 24th & 25th November 2024
📍 Jeddah, Saudi Arabia
Read all the details for the upcoming #TATAIPL Mega Auction 🔽🤩
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2024
दरम्यान आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 1 हजार 574 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. त्यामध्ये 320 कॅप्ड, 1 हजार 224 अनकॅप्ड तर 30 खेळाडू हे असोसिएट देशाचे खेळाडू आहेत. या 1 हजार 574 मधून फक्त 204 खेळाडूंचीच निवड केली जाणार आहे. कॅप्ड म्हणजे आपल्या देशांचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू. तर या वर्षापासून अनकॅप्ड खेळाडूची व्याख्या बदलली आहे. देशासाठी न खेळलेला आणि 5 वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू या दोघांची गणना ही अनकॅप्ड म्हणूनच केली जाणार आहे.