आयपीएल 2025 स्पर्धेच्या मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी 31 ऑक्टोबरपर्यंत सुपूर्द करायची आहे. त्यानंतर मेगा लिलावात इतर खेळाडूंवर बोली लागणार आहे. फ्रेंचायझी खेळाडूंसाठी हवी तितकी रक्कम मोजण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, मुंबई इंडियनस, चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरसाठी फिल्डिंग लावली आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघात घेण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी फ्रेंचायझींची आहे. वॉशिंग्टन सुंदर सध्या सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे. पण त्याला रिटेन करण्याची शक्यता फारच कमी आहे. पण राइट टू मॅट कार्डचं वापर करून त्याला सनरायझर्स हैदराबाद विकत घेऊ शकते. दरम्यान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी एक वेळा जेतेपद पटकावलं आहे. पण वॉशिंग्टन सुंदरची इतकी डिमांड का आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चला तर या मागचं कारण जाणून घ्या
वॉशिंग्टन सुंदर मागच्या दोन वर्षात जबरदस्त फॉर्मात आहे. अष्टपैलू म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे. ऑफ स्पिनरसह तो टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरला फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. इतकंच काय तर सुंदर नव्या चेंडूनेही गोलंदाजी करू शकतो. त्याचा टी20 क्रिकेटमधील इकोनॉमी रेड हा जबरदस्त आहे. वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत खेळलेल्या 52 टी20 सामन्यात 47 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रे हा 6.87 प्रति ओव्हर आहे. त्यामुळे इतक्या ताकदीचा खेळाडू संघात आला की क्षमता वाढेल यात शंका नाही.
वॉशिंग्टन सुंदरने आयपीएल 2017 मध्ये डेब्यू केलं होतं. रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता. त्यानंतर 2018 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुत त्याला स्थान मिळालं. चार वर्षे या संघासोबत खेळल्यानंतर मागच्या तीन पर्वात सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. आयपीएलच्या 58 टी20 सामन्यात त्याने 37 विकेट घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीतही चांगला आहे. पण त्याला आयपीएलमध्ये टॉप ऑर्डरला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या नावावर एकही अर्धशतक नाही.