KKR vs RCB : आरसीबीला पहिल्यांदा बसला धक्का! तिसऱ्या चेंडूवर नको ते झालं आणि पाचव्या चेंडूवर वसुली

| Updated on: Mar 22, 2025 | 8:06 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत आरसीबीने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्याच षटकात दोन घडामोडी घडल्या. तिसऱ्या चेंडूवर आरसीबी बॅकफूटवर गेली, पण पाचव्या चेंडूवर कमबॅक केलं.

KKR vs RCB : आरसीबीला पहिल्यांदा बसला धक्का! तिसऱ्या चेंडूवर नको ते झालं आणि पाचव्या चेंडूवर वसुली
Image Credit source: RCB Twitter
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर दुसऱ्या डावात पडणारं दव पाहता प्रथम गोलंदाजी करणं परवडतं, असं पाहिलं गेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या वाटेला पहिल्यांदा फलंदाजी आली. त्यामुळे आक्रमक फलंदाजी करून मोठी धावसंख्या देण्याचं लक्ष्य होतं. पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी केकेआरकडून क्विंटन डीकॉक आणि सुनील नरीन ही जोडी मैदानात उतरली होती. त्यामुळे आक्रमक सुरुवात होईल यात काही शंका नव्हती. पण कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या डावात आक्रमक सुरुवात चाचपडली. पहिलं षटक टाकण्यासाठी जोश हेझलवूडच्या हाती रजत पाटिदारने चेंडू सोपवला होता.

जोश हेझलवूडच्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी डी कॉक समोर होता. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार मारला. त्यामुळे आरसीबीवर दबाव वाढला होता. तिसऱ्या चेंडूवर डीकॉकने उत्तुंग फटका मारताना चुकला आणि चेंडू वर चढला. लेग साईडला आरामात झेल पकडला जाईल असं वाटलं होतं. चेंडूच्या बरोबर खाली सुयश शर्मा आला होता. मात्र आवाज आणि पहिल्या सामन्याची धाकधूक त्याच्या चेहऱ्यावर दिसली. या गडबडीत त्याने सोपा झेल सोडला. त्यामुळे आरसीबीच्या इतर खेळाडूंचा संताप स्पष्ट दिसला. कारण डीकॉकला जीवदान म्हणजे गोलंदाजांचं मरण..चौथा चेंडू निर्धाव गेला. पण पाचव्या चेंडूवर हेझलवूडचा सामना करताना डीकॉक चुकला आणि बॅटची कट लागून जितेश शर्माच्या हाती गेला. डीकॉकचा खेळ 4 धावांवर संपला. या विकेटसह सुयश शर्माचा जीव भांड्यात पडला.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल