आयपीएल 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) यंदा मेगा ऑक्शन होणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे सध्या आयपीएल रिटेन्शनकडे लागून आहे. काही तासांमध्ये एकूण 10 फ्रँचायजी आपल्या संघात कुणाला कायम ठेवलंय आणि कुणाला करारमुक्त केलंय? याची यादी जाहीर करणार आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक फ्रँचायजी त्यांच्या गोटातील अनुभवी खेळाडूंना करारमुक्त अर्थात रिलीज करणार असल्याचं म्हटलं जात आहे. संघात कुणाला ठेवणार आणि कुणाला सोडणार? हे जाहीर करण्यासाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व 10 संघांना कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत द्यायची आहेत.
आयपीएल 18व्या मोसमासाठी कोणते खेळाडू ऑक्शनमध्ये उतरणार आणि कोण नाही? हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांना कायम ठेवलं जाईल ते संघांसोबत राहतील. तर ज्यांना करारमुक्त खेळाडू ऑक्शनमध्ये उतरतील. क्रिकेट चाहत्यांना कुणाला रिटेन केलंय आणि कुणाला रिलीज? हे लाईव्ह पाहता येणार आहे. नियमांनुसार प्रत्येक टीम संघात जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकते. फ्रँचायजी ऑक्शनआधी किंवा राईट टू मॅच कार्ड याद्वारे ऑक्शन दरम्यान खेळाडूला घेऊ शकते. या रिटेन्शनमध्ये जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडूच कायम ठेवू शकते. तर प्रत्येक टीम जास्तीत जास्त 5 कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकते.
आयपीएल 2025 रिटेन्शनबाबत सर्वकाही
NEWS 🚨 – IPL Governing Council announces TATA IPL Player Regulations 2025-27.
READ – https://t.co/3XIu1RaYns #TATAIPL pic.twitter.com/XUFkjKqWed
— IndianPremierLeague (@IPL) September 28, 2024
आयपीएल 2025 रिटेन्शन लाईव्ह आज गुरुवारी 31 ऑक्टोबरला होणार आहे.
आयपीएल 2025 रिटेन्शन लाईव्ह टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
आयपीएल 2025 रिटेन्शन मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.