आयपीएलच्या 18 व्या मोसमाला (Ipl 2025) 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी बीसीसीआयने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर स्लो ओव्हर रेटमुळे बंदीची कारवाई केली. त्यामुळे सूर्यकुमार यादव हा मुंबईचं चेन्नईविरुद्धच्या सामन्यात नेतृत्व करणार आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सनेही पहिल्या 3 सामन्यांसाठी कर्णधार बदलला आहे. राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन दुखापतीतून पूर्णपणे फिट न झाल्याने टीम मॅनेजटमेंने पहिल्या 3 सामन्यांसाठी दुसऱ्या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा दिली आहे. त्यानुसार युवा ऑलराउंडर रियान पराग राजस्थानचं पहिल्या 3 सामन्यांत नेतृत्व करणार आहे. राजस्थान या हंगामातील आपला पहिला सामना 23 मार्चला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.
संजू सॅमसन याला गेल्या काही आठवड्यांपासून बोटाच्या दुखापतीचा सामना करावा लागत आहे. संजू या दुखापतीतुन पूर्णपणे फिट झालेला नाही. संजूला संबंधित यंत्रणेकडून बॅटिंग करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र विकेटकीपिंगसाठी अजूनही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे रियान परागला कर्णधार करण्यात आलं आहे. रियान पराग पहिल्या 3 सामन्यांत राजस्थानचं नेतृत्व करणार असल्याचं टीम मॅनेजमेंटने गुरुवारी 20 मार्च रोजी जाहीर केलं. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे संजू सॅमसन फलंदाज म्हणून खेळणार आहे.
संजूने संपूर्ण संघासमोर रियान नेतृत्व करणार असल्याचं जाहीर केलं आहे. संजूला इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेतील पाचव्या टी 20i सामन्यात बोटाला दुखापत झाली होती. संजू तेव्हापासून ऑफ फिल्ड होता. मात्र बीसीसीआयच्या वैदकीय पथकाने संजूला फिट असल्याचं जाहीर केल्यानंतर फलंदाज सरावासाठी राजस्थान टीमसह जोडला गेला. मात्र संजूला अजूनही विकेटकीपिंग करण्याची परवानगी केव्हा मिळणार? याची प्रतिक्षा आहे.
दरम्यान रियान पराग याची आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ असणार आहे. रियानला कॅप्टन्सीचा अनुभव नाही. त्यामुळे रियानसाठी हा नवा अनुभव असणार आहे. त्यामुळे पहिल्या 3 सामन्यांत रियानचा कस लागणार आहे.
राजस्थान विरुद्ध हैदराबाद, 23 मार्च
राजस्थान विरुद्ध कोलकाता, 26 मार्च
राजस्थान विरुद्ध चेन्नई, 30 मार्च
पहिल्या 3 सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्स टीम : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, वानिंदु हसारंगा, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय सिंह, नीतीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, फझलहक फारूकी, युद्धवीर सिंह चरक, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, अशोक शर्मा आणि कुणाल राठोड.