मुंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये सामना सुरू आहे. दिल्लीला हैदराबाद संघाने 144 धावांच्या आतमध्ये रोखलं आहे. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार यानेही अप्रतिम गोलंदाजी केली. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि मनीश पांडे यांनी सर्वाधिक 34 धावा केल्या. सीझनमधील दुसरा विजय मिळवण्यासाठी दिल्लीच्या गोलंदाजांना हैदराबाद संघाला रोखावं लागणार आहे.
दिल्लीची बॅटींग
दिल्ली संघाची आजही सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने सलामीला फिलिप सॉल्टला शून्यावर बाद केलं. त्यानंतर मार्श याने आक्रमक सुरूवात केली खरी पण त्याला 25 धावांवर नटराजनने आऊट केलं. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत दिल्लीच्या बॅटींगला सुरंग लावला. वॉर्नरपाठोपाठ सरफराज खानला आही काही चमक दाखता आली नाही, 10 धावा करून तो माघारी परतला. अमीन खानही 4 धावा करून आऊट झाला. अक्षर पटेल आणि मनीष पांडे यांनी खरा दिल्लीचा डाव सावरला. दोघांनी प्रत्येकी 34 धावा करत संघाला 144 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम (C), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (W), मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), फिलिप सॉल्ट (W), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा