दुबई | आयपीएल 17 व्या मोसमासाठी मंगळवारी 19 नोव्हेंबर रोजी ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनचं आयोजन दुबईत करण्यात आलंय. ऑक्शनला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी मराठी भाषिकांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उपेक्षा होणार आहे. आयपीएल ऑक्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर जिओ सिनेमा एपवर एकूण 7 भाषांमध्ये समालोचन केलं जाणार आहे. मात्र या 7 भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश नाही.
इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कनाडा, पंजाबी आणि भोजपुरी या 7 भाषांमध्ये जिओ सिनेमा एपवर आयपीएल ऑक्शनचं दिग्गजांकडून विश्लेषण करण्यात येणार आहे. त्या त्या भाषेतील क्रिकेटपटू हे ऑक्शनबाबत चाहत्यांना समजेल, उमजेल अशा सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहेत. मात्र मराठीचा समावेश नसल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.
जिओ सिनेमा एपवर टीम इंडियाचा भारतात होणारा प्रत्येक क्रिकेट सामना मोफत पाहता येतो. जिओ सिनेमावर क्रिकेट चाहत्यांना विविध भाषांपैकी आपल्या मायबोलीत क्रिकेट समालोचनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट चाहते जिओ सिनेमा एपवर आवर्जुन आपल्या मराठीत समालोचनाचा आनंद घेतात. मात्र आयपीएल ऑक्शनचं समालोचन इतर 7 भाषांमध्ये होत असताना मराठीला डावळलल्याने क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयपीएल ऑक्शनमध्ये 333 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. लिलावातून या 33 खेळाडूंमधून फक्त 77 जणांना घेतलं जाणार आहेत. या 77 खेळाडूंपैकी 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत. तर उर्वरित जागा भारतीय खेळाडूंसाठी आहेत.
एकूण 7 भाषांमध्ये मराठी नाही
JioCinema will have coverage in 7 different languages on IPL auction day from 12 pm IST.
– English, Hindi, Tamil, Telugu, Kannada, Punjabi & Bhojpuri. pic.twitter.com/1DXGougjhG
— Johns. (@CricCrazyJohns) December 16, 2023
333 खेळाडूंमध्ये 116 कॅप्ड खेळाडू आहेत. कॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू. तर 215 खेळाडू हे अनकॅप्ड आहेत. अनकॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले खेळाडू. एकूण 10 संघ 77 खेळाडूंसाठी 262 कोटी 95 लाख रुपये इतकी रक्कम खर्च करणार आहेत. त्यामुळे आता या मोसमातील कोणता खेळाडू हा महागडा ठरतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. तसेच कोणत्या युवा खेळाडूंचं नशिब फळफळेल, हे पाहणंही तेवढेच औत्सुक्याचं ठरणार आहे.