IPL Mega Auction 2025 Live : मॉर्की प्लेअर्ससाठी बोली समाप्त, ऋषभ पंत आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू

| Updated on: Nov 24, 2024 | 5:35 PM

IPL Auction 2025 Live Updates in Marathi: आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे लाईव्ह ऑक्शनचं आयोजिन करण्यात आलं आहे. या ऑक्शनमधून एकूण 204 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

IPL Mega Auction 2025 Live : मॉर्की प्लेअर्ससाठी बोली समाप्त, ऋषभ पंत आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू
IPL 2025 MEGA AUCTION LIVE UPDATES
Follow us on

LIVE Cricket Score & Updates

  • 24 Nov 2024 05:35 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : मॉर्की सेट 2 मधील बोली पूर्ण, कुणाला किती कोटी?

    आयपीएल ऑक्शन 2025 मधील 2 सेटमधील 6 मॉर्की खेळाडूंवरील बोली पूर्ण झाली आहे. या दुसऱ्या सेटमध्ये मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर,  युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, लियाम लिविंगस्टोन आणि केएल राहुल यांचा समावेश होता.  कुणाला किती कोटी आणि कोणत्या टीमने घेतलं जाणून घेऊयात.

    • मोहम्मद शमी : हैदराबाद, 10 कोटी, लखनऊ
    • डेव्हिड मिलर – 7.5 कोटी, लखनऊ
    • युझवेंद्र चहल : 18 कोटी, पंजाब
    • मोहम्मद सिराज : 12.25 कोटी, गुजरात
    • लियाम लिविंगस्टोन : 8.75 कोटी, आरसीबी
    • केएल राहुल : 14 कोटी, दिल्ली
  • 24 Nov 2024 04:57 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : मार्की प्लेअर सेट 1 मधील सोल्ड खेळाडू, ऋषभ पंत सर्वात महागडा

    आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मधील मार्की प्लेअर सेटमधील 6 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ऋषभ पंत हा या सेटमधील आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

    पहिल्या सेटमधील 6 खेळाडूंची किंमत आणि टीम

    • ऋषभ पंत : 27 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
    • श्रेयस अय्यर : 26 कोटी 75 लाख, पंजाब किंग्स
    • अर्शदीप सिंह : 18 कोटी, पंजाब किंग्स
    • जॉस बटलर : 15 कोटी 75 लाख, गुजरात
    • मिचेल स्टार्क : 11 कोटी 75 लाख, दिल्ली
    • कगिसो रबाडा : 10 कोटी 75 लाख, गुजरात

  • 24 Nov 2024 04:40 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : ऋषभ पंत आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू, श्रेयसचा रेकॉर्ड ब्रेक

    ऋषभ पंत याने काही मिनिटांमध्येच श्रेयस अय्यर याचा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असण्याचा बहुमान हिसकावला आहे. श्रेयस अय्यर याला पंजाब किंग्सने 26 कोटी 75 लाख रुपयांमध्ये घेतलं. मात्र त्यानतंर लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतसाठी श्रेयसच्या तुलनेत 25 लाख रुपये जास्त मोजले आणि 27 कोटींमध्ये आपल्या गोटात घेतलं.

  • 24 Nov 2024 04:30 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात

    आयपीएल 17 व्या मोसमातील सर्वात महागडा ठरलेल्या मिचेल स्टार्कला यंदा झटका बसला आहे.. दिल्ली कॅपिट्ल्सने मिचेलला 11 कोटी 75 लाख रुपयांमध्ये आपल्या गोटात घेतंल आहे. त्यामुळे मिचेलला काही कोटींचं नुकसान झालं आहे. स्टार्कची बेस प्राईज ही 2 कोटी होती.

  • 24 Nov 2024 04:24 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : जॉस बटलर गुजरातचा, किती मिळाले?

    इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला गुजरातने ऑक्शनमधून आपल्या गोटात घेतलं आहे. जोसला 15.75 कोटी रुपयांमध्ये गुजरातने घेतलं आहे.


  • 24 Nov 2024 04:18 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू

    श्रेयस अय्यर याने इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयससाठी 26 कोटी 75 लाख रुपये मोजून त्याला पंजाब किंग्सने आपल्या गोटात घेतलं आहे.

  • 24 Nov 2024 04:02 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : कगिसो रबाडाला गुजरात टीमकडून 10 कोटी 75 लाख

    वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला गुजरात टीमकडून 10 कोटी 75 लाख रुपयांमध्ये घेतलं आहे. रबाडाच्या आधीच्या पंजाब संघाने त्याला आरटीएमद्वारे घेण्यास नकार दिला. त्यामुळे रबाडा आता गुजरातचा झाला आहे.

  • 24 Nov 2024 03:57 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : अर्शदीप सिंह पंजाबचाच, पीबीकेसकडून 18 कोटी, RTM द्वारे घेतलं

    पंजाब किंग्सने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला आरटीएमचा उपयोग करत 18 कोटी रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं आहे. अर्शदीपची बेस प्राईज ही 2 कोटी होती.

  • 24 Nov 2024 03:53 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : अर्शदीप सिंहपासून मेगा ऑक्शनला सुरुवात, बॉलरसाठी जोरदार चुरस

    वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याच्यापासून मेगा ऑक्शनला सुरुवात झाली आहे. अर्शदीपची बेस प्राईज ही 2 कोटी आहे. मात्र अर्शदीपला आपल्या गोटात घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. अर्शदीपला आता किती भाव मिळतो? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

  • 24 Nov 2024 03:41 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Live Updates : आयपीएल मेगा ऑक्शनला सुरुवात

    आयपीएल 2025  मेगा ऑक्शनला सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे सुरुवात झाली आहे.  फ्रँचायजी अनेक खेळाडूंना आपल्यात ताफ्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अवघ्या काही मिनिटानी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

  • 24 Nov 2024 02:35 PM (IST)

    जयंत पाटील सांगलीतून मुंबईकडे रवाना

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीतुन मुंबईकडे रवाना झाले आहेत. इस्लामपूर येथून वाहनाने जयंत पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर इस्लामपूर मधील विजयाचा जल्लोष टाळत जयंत पाटलांनी मौन बाळगले होते.

  • 24 Nov 2024 02:31 PM (IST)

    IPL Mega Auction 2025 Updates : पहिल्या दिवशी फक्त 87 खेळाडूंवर बोली लागणार

    मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अर्थात आज 24 नोव्हेंबरला 577 पैकी फक्त 84 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. उर्वरित इतर खेळाडूंवर दुसर्‍या दिवशी अर्थात 25 नोव्हेंबरला उर्वरित खेळाडूंवर झटपट बोली लावली जाणार आहे.

  • 24 Nov 2024 02:25 PM (IST)

    अजित पवारांचा उमेश पाटील, राजू खरे यांना अभिनंदनाचा फोन

    अजित पवारांचा उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे विजयी उमेदवार राजू खरे यांना अभिनंदनाचा फोन आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांचा दारुण पराभव केला.

  • 24 Nov 2024 02:15 PM (IST)

    अमरावतीत महायुतीचा दणदणीत विजय

    अमरावती जिल्ह्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. विजय उमेदवारांचे अमरावतीच्या राजापेठ भाजप कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला.

  • 24 Nov 2024 02:07 PM (IST)

    कोणत्या टीमकडे किती रक्कम?

    आयपीएल मेगा ऑक्श 2025 मध्ये एकूण 10 संघ मिळून 641 कोटी रुपये खर्च करु शकतात. पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 110.5 कोटी तर राजस्थानकडे सर्वात कमी 41 कोटी इतकी रक्कम आहे.

    • पंजाब किंग्स :110.50 कोटी
    • चेन्नई : 55 कोटी
    • बंगळुरु : 83 कोटी
    • दिल्ली : 73 कोटी
    • गुजरात : 69 कोटी
    • लखनऊ : 69 कोटी
    • कोलकाता : 51 कोटी
    • मुंबई : 45 कोटी
    • हैदराबाद : 45 कोटी
    • राजस्थान : 41 कोटी
  • 24 Nov 2024 01:45 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction : एका संघात किमान आणि कमाल किती खेळाडू ठेवण्याची अट?

    नियमांनुसार जास्तीत जास्त 25 तर कमीत कमी 18 खेळाडू टीममध्ये ठेवता येणार. तसेच त्या 25 खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू ठेवण्याची सूट आहे. तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 पेक्षा अधिक खेळाडूंना घेता येणार नाही.

  • 24 Nov 2024 01:09 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction : कोणत्या टीमकडून किती आणि कोणते खेळाडू रिटेन?

    आयपीएल मेगा ऑक्शनआधी रिटेन्शनसाठी नियमांनुसार, प्रत्येक संघाला 6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. त्यानुसार आरटीएम अर्थात राईट टु मॅच कार्ड पर्यायाचा समावेशही आहे. यामध्ये जास्तीत 2 अनकॅप्ड भारतीय खेळाडू घेण्याची तरतूद आहे. तसेच जास्तीत जास्त 5 खेळाडू कॅप्ड खेळाडू कायम अर्थात रिटेन ठेवण्याची मुभा होती. त्यात सर्व 5 भारतीय किंवा सर्व 5 परदेशी खेळाडू रिटेन करण्याची सूट होती. तर फक्त 1 अनकॅप्ड खेळाडू ठेवण्याची सूट होती.

    त्यानुसार मेगा ऑक्शनआधी एकूण 10 संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानुसार कोलकाता आणि राजस्थान या 2 संघांनी सर्वाधिक प्रत्येकी 6-6 खेळाडू रिटेन केले. कोणत्या संघाने किती आणि कोणते खेळाडू आपल्यासह कायम ठेवेल? जाणून घेऊयात.

    • मुंबई : जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा. (एकूण : 5)
    • चेन्नई : ऋतुराज गायकवाड, मथीथा पथीराणा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी. (एकूण : 5)
    • बंगळुरु : विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल. (एकूण : 3)
    • दिल्ली : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टह्स आणि इशान पोरेल. (एकूण : 4)
    • कोलकाता : रिंकु सिंह, वरुण चक्रवर्थी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमनदीप सिंह. (एकूण : 6)
    • लखनऊ : निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक अग्रवाल, मोहसिन खान आणि आयुष बदोनी. (एकूण : 5)
    • हैदराबाद : पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेन्रिक क्लासेन आणि ट्रेव्हिस हेड. (एकूण : 5)
    • गुजरात : राशिद खान, शुबमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान. (एकूण : 5)
    • पंजाब : शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह. (एकूण : 2)
    • राजस्थान : संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा. (एकूण : 6)
  • 24 Nov 2024 12:58 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction : कोणत्या टीमला किती खेळाडूंची गरज? विदेशी खेळाडूंची मर्यादा जाणून घ्या

    • चेन्नई – 20, 7 विदेशी खेळाडू
    • आरसीबी – 22, 8 विदेशी खेळाडू
    • एसआरएच – 20, 5 विदेशी खेळाडू
    • मुंबई – 20, 8 विदेशी खेळाडू
    • दिल्ली – 21, 7 विदेशी खेळाडू
    • राजस्थान – 19, 7 विदेशी खेळाडू
    • पंजाब – 19, 8 विदेशी खेळाडू
    • कोलकाता – 19, 6 विदेशी खेळाडू
    • गुजरात – 20, 7 विदेशी खेळाडू
    • लखनऊ – 20, 7 विदेशी खेळाडू
  • 24 Nov 2024 12:51 PM (IST)

    IPL 2025 Mega Auction : 46 खेळाडू रिटेन, आता 577 मधून 204 जणांची होणार निवड

    आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी थोड्यातच वेळात मेगा ऑक्शनला सुरुवात होणार आहे. या ऑक्शनमध्ये 577 खेळाडू आहेत. ऑक्शनमधील 577 खेळाडूंमध्ये 367 भारतीय आणि 210 परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये 3 असोसिएट देशांचे खेळाडू आहेत. या मेगा ऑक्शनमधून 10 संघांकडून 204 खेळाडूंची निवड केली जाणार आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त 70 परदेशी खेळाडूंना घेता येणार आहे. तर त्याआधी 10 संघांनी रिटेन्शनमध्ये एकूण 46 खेळाडू कायम ठेवले आहेत.

  • 24 Nov 2024 12:29 PM (IST)

    2 दिवस, 577 खेळाडू आणि 641 कोटी, थोड्याच वेळात मेगा ऑक्शन

    आयपीएल 2025 मेगा ऑक्शन एकूण 2 दिवस चालणार आहे. या मेगा ऑक्शमध्ये 204 जागांसाठी 577 खेळाडू ऑक्शनमध्ये आपलं नशिब आजमवणार आहेत.  या ऑक्शनसाठी किमान बेस प्राईज ही 30 लाख तर कमाल 2 कोटी इतकी आहे.  10 संघांनी अनेक स्टार खेळाडू रिलीज केले आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 10 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. आपण या लाईव्ह ब्लॉगमधून या मेगा ऑक्शनमधील प्रत्येक अपडेट्स जाणून घेणार आहोत.

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनला सुरुवात झाली आहे. एकूण 2 दिवस सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे हा मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये 577 खेळाडू असणार आहेत. एकूण 10 संघ 577 फक्त 204 खेळाडूंचीच निवड होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये 204 खेळाडूंवर एकूण 641 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर 373 खेळाडूंच्या पदरी निराशा पडणार आहे. त्यामुळे आता कोणते खेळाडू सोल्ड होतात आणि कोण अनसोल्ड राहतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या मेगा ऑक्शनचे संपूर्ण अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.