आयपीएल लिलावात खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडत आहे. संघाला गरज असलेल्या खेळाडूला घेण्यासाठी रस्सीखेंच सुरु आहे. मुंबई इंडियन्सकडे रिटेन्शनमध्येच दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे इतर खेळाडूंसाठी मुंबई इंडियन्स स्मार्ट खेळी करताना दिसत आहे. कारण मुंबई इंडियन्सकडे हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांना रिटेन केलं होतं. इतकंच काय नमन धीरसाठी मुंबई इंडियन्स आरटीएम कार्ड वापरलं आणि 5 कोटी 25 लाख रुपयांना संघात घेतलं. आता संघाला वेगवान गोलंदाजांची करत असताना ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरसाठी मोठी रक्कम मोजली. ट्रेंट बोल्टसाठी 12 कोटी 50 लाख, दीपक चाहरसाठी 9 कोटी 25 लाख रुपये मोजले. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात तिसरा महागडा खेळाडू ठरला तो विल जॅक्स.. मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सने जोर मारला. विल जॅक्स 2 कोटी बेस प्राईससह मैदानात उतरला होता. मुंबई इंडियन्सने पेडल उचलून आपला इंटरेस्ट दाखवला. त्यानंतर पंजाब किंग्सनेही बोली लावली. मग काय बोली पाहता पाहता 5 कोटींच्या पार गेली. पण मुंबईने 5 कोटी 25 लाखांची बोली लावताच पंजाबने माघार घेतली.
मुंबईने 5 कोटी 25 लाखांची बोली लावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे आरटीएम पर्याय होता. त्यामुळे मुंबईला धाकधूक लागून होती. कारण विल जॅक्ससाठी किती रक्कम बोलावी याबाबत संभ्रम होता. त्यात शेवटच्या टप्प्यात 11 कोटी पर्समध्ये होते. त्यात 5.25 कोटींची बोली लावली होती. त्यामुळे आता आरसीबीने पेडल उचललं की ही रक्कम 6 कोटींच्या पार जाईल असंच वाटत होतं. पण आरसीबीने आरटीएम कार्ड वापरलं नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा जीव भांड्यात पडला आणि विल जॅक्स ताफ्यात आला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी आरसीबीच्या टेबलवर जाऊन आभार मानले.
Akash Ambani hugging RCB management after not deciding to RTM for Will Jacks 👀#IPL2025 #RCBAuction #IPLAuction2025 #IPLRetention2025 pic.twitter.com/TmK9UyhmQR
— Mr StarK 🕶️ (@playlikebatman) November 25, 2024
विल जॅक्स ऑफ ब्रेक टाकतो आणि आक्रमक फलंदाजी करतो. त्याचा स्ट्राईक रेटही जबरदस्त आहे. विल जॅक्सने मागच्या पर्वात आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळला होता. तेव्हा विल जॅक्सने 8 धावा केल्या होत्या. तसेच दोन षटकं टाकत 24 धावा देत 1 गडी बाद केला होता.