IPL Auction : रचिन रविंद्रसाठी पंजाब किंग्सने 3.20 कोटींची बोली लावली! पण चेन्नईने केला असा गेम

| Updated on: Nov 24, 2024 | 7:27 PM

आयपीएल लिलावात बोली लावण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. पण चेन्नई सुपर किंग्सने स्मार्ट बोली लावली आणि पंजाबकडून आपला खेळाडू खेचून घेतला. आरटीएम कार्डमध्ये पंजाबला धूळ चारली. पंजाबची सहमालकीन प्रीति झिंटाही संभ्रमात पडली.

IPL Auction : रचिन रविंद्रसाठी पंजाब किंग्सने 3.20 कोटींची बोली लावली! पण चेन्नईने केला असा गेम
Follow us on

आयपीएल लिलावात आतापर्यंत सर्वात महागडी बोली लावण्यात आली आहे. ऋषभ पंतला संघात घेण्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींची बोली लावली. त्यानंतर श्रेयस अय्यरसाठी 26 कोटी 75 लाख मोजले. असं असताना काही चौथ्या सेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंसाठी बोली लावण्यात चढाओढ दिसली. चेन्नई सुपर किंग्सने रिटेन्शननंतर रचिन रविंद्रला सोडलं होतं. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी लिलावात बोली लावण्याशिवाय पर्याय नव्हता. रचिन रविंद्र 1.50 कोटी बेस प्राईसह लिलावात उतरला होता. त्यामुळे त्याच्यासाठी पंजाब किंग्सने जाळं टाकलं होतं. पण चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्ससमोर स्मार्ट बोली लावत बरोबर संघात घेतलं. खरं तर बेस प्राईसपासून चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चढाओढ सुरु झाली होती. पंजाब किंग्सने रचिन रविंद्रसाठी 3.20 बोली लावली आणि चेन्नई सुपर किंग्सने बोली थांबवली. त्यामुळे रचिन रविंद्र पंजाब किंग्ससोबत जाणार हे फिक्स झालं. पण गेम इथेच फिरला. लिलावकर्त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला आरटीएम कार्डबाबत विचारलं आणि त्या होकार दिला. त्यामुळे पंजाब किंग्सचं व्यवस्थापन संभ्रमात पडलं. ज्या खेळाडूसाठी बोली लावली नाही त्याच्यासाठी आरटीएम कार्ड वापरण्याचं कारण काय? पण ही चेन्नईची स्मार्ट खेळी होती.

पंजाब किंग्सने आरटीएम कार्डसाठी खूपच सल्लामसलत केली. पंजाबचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगने त्याच्यासाठी एक किंमत ठरवून सांगितलं. प्रीति झिंटाने 3.20 कोटींची बोली लावल्यानंतर आरटीएम कार्डसाठी 4 कोटी ठरवले. इथेच पंजाबने चूक केली आणि चेन्नईने त्याला संघात घेण्यास होकार दिला. खरं तर रचिन रविंद्र चांगला खेळाडू आहे. न्यूझीलंडचा संघ भारतात कसोटीसाठी आला होता. तेव्हा त्याला सरावासाठी चेन्नई फ्रेंचायझीकडून मदत झाली होती. आता त्याला स्मार्टपणे बोली लावून स्वस्तात संघात घेण्यात यश आलं.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल मेगा लिलावापूर्वी पाच खेळाडू रिटेन केले होते. ऋतुराज गायकवाडसाठई 18 कोटी, रविंद्र जडेजासाठी 18 कोटी मथिशा पथिरानासाठी 13 कोटी, शिवम दुबेसाठी 12 कोटी, धोनीसाठी अनकॅप्ड प्लेयर म्हणून 4 कोटी मोजले होते. आता आयपीएल लिलावात रविचंद्रन अश्विनसाठी 9 कोटी 75 लाख, डेवॉन कॉनव्हेसाठी 6 कोटी 25 लाख, रचिन रविंद्रसाठी 4 कोटी आणि राहुल त्रिपाठी सठी 3 कोटी 40 लाख मोजले.