मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर सनसनाटी विजय मिळवला. शेवटच्या बॉलमध्ये 10 धावा हव्या असताना रविंद्र जडेजा याने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर सलग सिक्स आणि फोर ठोकत चेन्नईला विजयी केलं. चेन्नई यासह पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरली. महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स टीमने ही कामगिरी केली. चेन्नईच्या या विजयानंतर धोनीसुद्धा आयपीएलला रामराम ठोकतो की काय, असं क्रिकेट चाहत्यांना वाटत होतं. मात्र सामन्यानंतर धोनीने माझ्याकडे याबाबत निर्णयासाठी 8-9 महिन्यांचा वेळ आहे, असं म्हटलं होतं.
दरम्यान आयपीएल फायनलच्या 14 दिवसांनंतर चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायजीने धोनीचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे. अवघ्या 33 सेकंदांचा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत धोनीचे काही विशेष क्षण दाखवण्यात आले आहेत. या ट्विटमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. या ट्विटमुळे धोनी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर घेतो की काय, असा अंदाज बांधला जात आहे.
धोनीने आतापर्यंत अचानक भयानक अशा पद्धतीनेच अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. धोनीने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता धोनी अशाच पद्धतीने आयपीएल सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचीही चर्चा रंगलीय.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 16 वा मोसमात चॅम्पियन होऊन मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली. चेन्नई सर्वाधिक संयुक्तपणे 5 आयपीएल ट्रॉफी जिंकणारी टीम ठरली आहे. चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि आता 2023 अशा एकूण 5 वेळा हा कारनामा केलाय. तर मुंबई इंडियन्स टीमने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षात आयपीएल फायनलमध्ये विजय मिळवला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचं ट्विट
Oh Captain, My Captain! ?#WhistlePodu #Yellove ?? @msdhoni pic.twitter.com/whJeUjWUVd
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 13, 2023
चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.