मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये 29 वा सामना सूरू आहे. सीएसकेने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना सनराइजर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकात 134 धावा केल्या आहेत. हैदराबादच्या संघाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर जडेजाने चेन्नईकडून 3 विकेट्स घेतल्या. हैदराबादने चेन्नईला पराभूत केलं तर हा त्यांचा चेन्नईच्या मैदानावर पहिलाविजय ठरणार आहे.
हैदराबाद संघाची बॅटींग
सनराइजर्स संघाची सुरूवात चांगली झाली होती. अभिषेक शर्मा आणि हॅरी ब्रूक आज सलामीला आले होते. मात्र मयंक अग्रवाल याच्या जागी अभिषेकला सलामीला उतरवण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला होता. हा फार काही योग्य ठरला नाही. हॅरी ब्रूक याला 18 धावांवर असातान आकाश सिंगने बाद केला होता. ऋतुराज गायकवाड याने कमाल कॅच घेतला होता. त्यानंतर अभिषेक शर्माने एक बाजू लावून धरली होती. रविंद्र जडेजाने शर्माला आऊट करत ही जोडी फोडली.
राहुल त्रिपाठी 21 धावा, एडन मार्करम 12 धावा, हेनरिक क्लासेन 17 धावा आणि मार्को जॅनसेन याने नाबाद 17 धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मारून दिली. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने 3 विकेट्स, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना आणि आकाश सिंग यांनी 1 विकेट्स घेतली.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक