मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यामध्ये सीएसकेने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. हैदराबाद संघाच्या 135 धावांचा पाठलाग करताना सीएसकेने 3 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केलं. एकतर्फी सामन्यामध्ये डेव्हॉन कॉनवे याने सर्वाधिक नाबाद 77 धावांची खेळी केली. त्यासोबतच ऋतुराज गायकवाड यानेही 35 धावा केल्या. हैदराबादच्या मयंक मार्कंडे याने घेतलेल्या 2 विकेट्स सोडता इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळवता आलं नाही. चेन्नईने अद्याप एकदाही हैदराबादला चेपॉकमध्ये विजय मिळवून दिला नाही.
सनराइजर्स हैदराबाद संघाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची दमदार सुरूवात झालेली होती. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पॉवर प्लेमध्ये बिनबाद 60 धावा केल्या काढल्या होत्या. दोघांनी 87 धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाड 33 धावांवर असताना रन आऊट झाला. अजिंक्य रहाणे 9 धावा आणि अंबाती रायुडू 9 धावा यांना मयंकने आपल्या जाळ्यात अडकलं. दुसरीकडे कॉनवेने नाबाद 77 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
हैदराबाद संघाची बॅटींग
सनराइजर्स संघाची सुरूवात चांगली झाली होती. अभिषेक शर्मा आणि हॅरी ब्रूक आज सलामीला आले होते. मात्र मयंक अग्रवाल याच्या जागी अभिषेकला सलामीला उतरवण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला होता. हा फार काही योग्य ठरला नाही. हॅरी ब्रूक याला 18 धावांवर असातान आकाश सिंगने बाद केला होता. ऋतुराज गायकवाड याने कमाल कॅच घेतला होता. त्यानंतर अभिषेक शर्माने एक बाजू लावून धरली होती. रविंद्र जडेजाने शर्माला आऊट करत ही जोडी फोडली. अखेर हैदराबादला 134 धावाच करता आल्या.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक