अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामना हा रविवारी 28 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या 16 व्या मोसमातील अखेरच्या सामन्यात रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात अनेक कलाकार परफॉर्मन्स करणार आहेत. या आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. तर त्यानंतर आशिया कप स्पर्धाही नियोजित आहे.
आगामी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये भारतात आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी अहमदाबाद इथे आयपीएल 2023 फायनलच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. बीसीसीआय सचिव यांनी या दरम्यान बरीच माहिती दिली. जय शाह यांनी पत्रकार परिषदेत वर्ल्ड कप वेळापत्रक, आशिया कप आयोजन, एकदिवसीय मालिका या आणि अशा विविध विषयांवर भाष्य केलं.
टीओयनुसार, आयसीसी वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल दरम्यान होणार असल्याचं जय शाह यांनी सांगितलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना हा 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शाह यांच्या माहितीनुसार, वर्ल्ड कपचं वेळापत्रक हे 7 ते 12 जून या दरम्यान जाहीर केलं जाऊ शकतं.
बीसीसीआय आयपीएल फायनल 2023 च्या आयोजनात बिजी आहे. त्यामुळे बीसीसीआयने एका दगडात 2 पक्षी मारत डोकं लावलंय. बीसीसीआयने आशिया कपच्या आयोजनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांना आयपीएल अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केलंय. या दरम्यान बीसीसीआय आणि अन्य क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांसह आशिया कपच्या आयोजनावर चर्चा होईल. त्यामुळे येत्या 24 तासात अखेर आशिया कप आयोजनाच्या वादावर पडदा पडेल,अशी आशा आहे.
बीसीसीआय सचिव यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
Major points from the press conference of Jay Shah: [TOI]
– World Cup schedule set to announce during WTC final.
– Asia Cup decision during IPL final.
– Afghanistan ODI series before the World Cup.
– India A tours will start soon.
– India Women's coach will be announced on June. pic.twitter.com/F2rzZuFXbJ— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2023
तसेच वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात येईल. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आशिया कपबाबत काय निर्णय होतो याकडे असणार आहे.