MS Dhoni : …तर धोनी मुंबईचा कॅप्टन असता, आयपीएलच्या एका नियमामुळे सीएसकेने लिलावात मारलेली बाजी!

| Updated on: Jun 02, 2023 | 8:49 PM

IPL Auction MS Dhoni 2008 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन फ्रँचायजी लिलावामध्ये धोनीसाठी एकमेकांना भिडले होते. मात्र आयपीएलच्या त्या एका नियमामुळे माहीला आपल्या ताफ्यात घेण्यात चेन्नईला यश आलं होतं. काय झालं होतं नेमकं??

MS Dhoni : ...तर धोनी मुंबईचा कॅप्टन असता, आयपीएलच्या एका नियमामुळे सीएसकेने लिलावात मारलेली बाजी!
Follow us on

मुंबई : आयपीएल म्हटलं की मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघाशिवाय विषयच पूर्ण होत नाही. या दोन संघांनी तशा प्रकारचा खेळ दाखवत इतिहास रचले आहेत. सीएसके आताच्या पर्वातील विजयासह आणि मुंबईने पाचवेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्त्वाखाली दोन्ही संघांना यश मिळालं आहे. धोनीला 2008 साली लिलावामध्ये 1.5 मिलियन डॉलरला धोनीला पहिल्या लिलावामध्ये बोली लागली होती. त्या  लिलावामध्ये एका नियमामुळे सीएसकेने धोनीला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं. नाहीतर धोनी मुंबईकडून खेळताना दिसला असता.

महेंद्रसिंग धोनी त्यावेळी भारताचा T20 आणि ODI कर्णधार होता. 400,000 अमेरकिन डॉलर्सपासून सुरू झालेल्या बोलीनंतर ही बोली 900,000 अमेरकिन डॉलर्सपर्यंत थांबली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन फ्रँचायजी लिलावावेळी एकमेकांना भिडले होते. यामध्ये चेन्नईने बाजी मारत विकत घेतलं होतं.

आयपीएल 2008 मध्ये आयकॉन प्लेयरचा नियम होता. म्हणजेच लिलावापूर्वी फ्रँचायझीला आयकॉन खेळाडू घेता येत होता. संघातील सर्वात महागड्या खेळाडूपेक्षा त्याला 15 टक्के जास्त मानधन देण्याचा नियम होता. एका संघाची एकूण पर्स 5 दशलक्ष होती, म्हणजे त्यांना खेळाडू खरेदी करायचे होते. मुंबईने सचिन तेंडुलकर, दिल्लीचा वीरेंद्र सेहवाग, कोलकाता सौरव गांगुली, बंगळुरू राहुल द्रविड आणि पंजाब युवराज सिंग यांना आयकॉन खेळाडू म्हणून निवडले. चेन्नई सुपर किंग्जकडे एकही आयकॉन खेळाडू नव्हता.

काय होता आयपीएलचा ‘तो’ नियम?

मुंबईने धोनीसाठी 1.5 मिलियन डॉलर्स लावले, त्यांना नंतर लक्षात आलं असावं की महागड्या खेळाडूपेक्षा आयकॉन खेळाडूला 10 टक्के ते15 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. त्यामुळे त्यांचे जवळपास 3 मिलिअनपेक्षा जास्त पैसे गेले असते आणि काहीच शिल्लक राहिलं नसतं. त्यामुळे धोनी चेन्नईमध्ये आल्याचं सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने पहिल्याच सत्रात महेंद्रसिंग धोनीला आपला कर्णधार बनवले होते. संघ अंतिम फेरीत पोहोचला पण अखेरीस राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. 2010 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम चॅम्पियन झाली. 2011 मध्येही विजेतेपद पटकावले. त्यानंतर 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनले.  गुजरात टायटन्सचा पराभव करून धोनीच्या संघाने 5व्यांदा लीगचे विजेतेपद पटकावले.