IPL Final 2023 : किंग कोहलीची पत्नी अनुष्का सीएसकेची फॅन? फायनल जिंकल्यानंतर केलेलं वक्तव्य होतंय व्हायरल!

| Updated on: May 30, 2023 | 9:36 PM

चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाचा फायनल सामन्यात 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने इतिहास रचला असून पाचवेळा त्यांनी आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. पत्नी अनुष्का शर्माची एक पोस्ट व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे.

IPL Final 2023 : किंग कोहलीची पत्नी अनुष्का सीएसकेची फॅन? फायनल जिंकल्यानंतर केलेलं वक्तव्य होतंय व्हायरल!
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 16 पर्वाची फायनल तीन दिवस चालली, पाऊस आणि जोराचा वारा स्टेडिअममध्ये पाणी झालेलं होतं. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाचा फायनल सामन्यात 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने इतिहास रचला असून पाचवेळा त्यांनी आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या विजयानंतर सीएसकेचं सर्वत्र शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच आरसीबी संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्माची एक पोस्ट व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे.

काय म्हणाली अनुष्का शर्मा?

“रोमांचक सामना! आश्चर्यकारक विजय! क्या शानदार टीम.” असं म्हणत अनुष्का शर्माने सोबत एक पिवळ्या रंगाच हार्ट इमोजी देखील टाकला आहे.  अनुष्काने आपल्या स्टोरीला, धोनीने रविंद्र जडेजा याला उचलून घेतलेला फोटो शेअर केला आहे. अनुष्काची इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे.

अनुष्काचा पती विराट कोहली याचा आरसीबी संघ लीग स्टेजमधून बाहेर पडला होता. गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव करत त्यांना लीग स्टेजमधून बाहेर केलं होतं.  मुंबई आणि आरसीबी या दोन संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल असं वाटत होतं. मात्र गुजरातने आरसीबीचा पराभव करत त्यांना बाहेर काढलं होतं.

सामन्याचा धावता आढावा