IPL Final 2023 : रविंद्र जडेजाने ‘ज्या’ बॅटने फायनल जिंकवली, ‘त्या’ बॅटचा एका इन्स्टा स्टोरीने झाला खुलासा!

| Updated on: Jun 02, 2023 | 10:02 PM

Ravindra Jadeja Ajay Mandal : शेवटच्या बॉलवर संघाला विजय मिळवून देत रविंद्र जडेजा मॅचविनर ठरला. गुजरात टायटन्स संघाचा गोलंदाज मोहित शर्मा याने आपल्या ओव्हरमध्ये टाकलेले पर्फेक्ट यॉर्कर पाहून शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा सामना जिंकवतील असं काही वाटलं नव्हतं. मात्र जडेजाने कमाल करून दाखवली.

IPL Final 2023 : रविंद्र जडेजाने ज्या बॅटने फायनल जिंकवली, त्या बॅटचा एका इन्स्टा स्टोरीने झाला खुलासा!
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 मध्ये अंतिम सामन्यात शेवटच्या बॉलवर संघाला विजय मिळवून देत रविंद्र जडेजा मॅचविनर ठरला. गुजरात टायटन्स संघाचा गोलंदाज मोहित शर्मा याने आपल्या ओव्हरमध्ये टाकलेले पर्फेक्ट यॉर्कर पाहून शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा सामना जिंकवतील असं काही वाटलं नव्हतं. मात्र जडेजाने कमाल करून दाखवली अन् सीएसकेने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सर जडेजाचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यसोबतच त्याने आणखी एक अशी गोष्ट केली जी वाचून तुम्ही जडेजाचे फॅन होताल.

रविंद्र जडेजाने फायनलमध्ये ज्या बॅटने चौकार आणि सिक्सर मारला ती बॅट आपल्या संघातील ज्युनिअर खेळाडूला आपली बॅट दिली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सीएसकेमधील अजय मंडल आहे. अजयने आपल्या इन्स्टा स्टोरीवर जडेजाने त्याला बॅट दिल्याची माहिती दिली.

अजयने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जडेजाने भेट दिलेल्या करिष्माई बॅटचा फोटो शेअर केला आहे. तुम्हाला आठवत असेल. सर जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा करून संघाचा अंतिम सामना कसा जिंकला. त्यानंतर त्यांनी मला आशीर्वाद म्हणून ही बॅट दिली. मला ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल चेन्नई सुपर किंग्जचे खूप खूप आभार, असं  अजय मंडलने आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

डावखुरा फलंदाज अजय छत्तीसगडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. फलंदाजीसोबतच अजय पार्ट टाईम फिरकी गोलंदाजीही करतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजयला 29 प्रथम श्रेणी, 23 लिस्ट ए आणि 34 टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे.

दरम्यान, अजयने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1320 धावा केल्या आहेत, तर लिस्ट A मध्ये 375 धावा आणि T20 मध्ये 246 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत त्याने प्रथम श्रेणीत 103 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने लिस्ट ए मध्ये 25 विकेट घेतल्या आहेत तर टी-20 क्रिकेटमध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत.