IPL Final Reserve Day : पावसाची मजबूत बॅटींग, बीसीसीआयने फायनल मॅचबाबत घेतला मोठा निर्णय!

| Updated on: May 29, 2023 | 12:39 AM

IPL Final Reserve Day : क्रिकेटप्रेमींना प्रश्न पडला की फायनल सामना जर आज झाला नाहीतर मग पुढे काय? हा सामना रद्द की सामना पुढे ढकलण्यात येणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते.

IPL Final Reserve Day : पावसाची मजबूत बॅटींग, बीसीसीआयने फायनल मॅचबाबत घेतला मोठा निर्णय!
Follow us on

मुंबई : आयपीएलमधील फायनल सामन्याआधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळाली. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामधील सामना उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना प्रश्न पडला की फायनल सामना जर आज झाला नाहीतर मग पुढे काय? हा सामना रद्द होणार की पुढे ढकलण्यात येणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. अशातच आयपीएलच्या ट्विटर हँडलवर अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

 

फायनल सामना उद्या म्हणजेच 29 मे ला नरेंद्र मोदी स्टेडिअममध्येच पार पडणार आहे. नेहमीप्रमाणे फायनल सामनाही संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होणार असून सात वाजता टॉस होणार आहे. सामना सुरू होण्याआधी अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं होतं. मात्र पावसाने सर्व पाणी करून टाकलं. सामना उद्या म्हणजेच सोमवारी ढकलल्यामुळे चाहते नाराज झालेले दिसून आले.

आता सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. उद्याच्या दिवशी पावसाने हजेरी लावू नये अशी प्रार्थना चाहते सोशल मीडियावर करत आहेत. आता उद्याच्या सामन्यामध्ये यंदाच्या पर्वातील चॅम्पिअन कोण ते समजेल.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.