IPL च्या पहिल्या लिलावात धोनीसाठी ‘या’ दोन संघांमध्ये झालेली जंगी लढाई, वाचा सविस्तर

| Updated on: Feb 21, 2023 | 12:51 AM

तुम्हाला माहित आहे का भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीला पहिल्या लिलावात किती रूपयांची बोली लागली होती.

IPL च्या पहिल्या लिलावात धोनीसाठी या दोन संघांमध्ये झालेली जंगी लढाई, वाचा सविस्तर
Follow us on

मुंबई : जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीगमध्ये आयपीएलचा समावेश आहे. आता यंदाच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक आलं असून 31 मार्चला पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. काही दिवसांपूर्वी वुमन्स आयपीएलचा लिलाव पार पडला. यामध्ये स्मृती मंधानाला सर्वाधिक 3 कोटी 40 लाखांची बोली लागली होती. मात्र तुम्हाला माहित आहे का भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीला पहिल्या लिलावात किती रूपयांची बोली लागली होती.

या लिलावात महेंद्रसिंह धोनीसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामन्याआधीच कडवी झुंज पाहायला मिळाली.  तेव्हा प्रत्येक टीमकडे लिलावासाठी 5 मिलियन डॉलर्स होते, म्हणजे 20 कोटी 6 लाख रुपये होते. जेव्हा बोली सुरू झाली तेव्हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने या अनुभवी खेळाडूसाठी बोली लावत होते.

जेव्हा लिलाव सुरू झाला तेव्हा धोनीची बेस प्राईज ही  400,000 अमेरिकन डॉलर होती. हा लिलाव  900,000 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला. शेवटी CSK ने 1.5 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतलं. भारतीय रकमेनुसार एम एस धोनीला त्या लिवावामध्ये 6.01 कोटी रुपये देऊन इतकी रक्कम मिळाली होती.

2008 साली झालेल्या लिलावामधील सर्वात महागडा खेळाडू धोनी ठरला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमंड्स 5.41 कोटी रूपयामध्ये डेक्कन चार्जर्सने विकत घेतलं होतं. सनथ जयसूर्याला मुंबईच्या संघाने 3.91 कोटी रूपेय मोजले होते. चौथ्या स्थानी भारतीय गोलंदाज इशांत शर्माला 3.71 कोटी रूपयांमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने खरेदी केलं होतं, तर पाचव्या स्थानी इरफान पठाण असून त्यालाकिंग्ज इलेव्हन पंजाबने विकत खरेदी केलं होतं.

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार आणि पोस्ट बॉय महेंद्रसिंह धोनी ODI आणि टी-20 संघाचा कर्णधार होता. 2007 साली झालेला पहिला टी-20 वर्ल्ड कप आपला नेतृत्त्वाखाली जिंकून दिला होता.