Team India : आयपीएल संपली आता टीम इंडियाचं पुढचं वेळापत्रक कसं असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: May 30, 2023 | 7:58 PM

आयपीएल स्पर्धेची रणधुमाळी आता संपली असून टीम इंडिया आता पुढच्या मार्गावर मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचं पुढचं वेळापत्रक कसं असेल याची उत्सुकता क्रिडाप्रेमींना आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

1 / 7
आयपीएल संपली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला जाणार आहे. यासाठी काही खेळाडू रवाना झाले आहेत. 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीचा सामना आहे.

2 / 7
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळणार आहे. यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांचा समावेश असेल असं सध्यातरी सांगण्यात येत आहे.

3 / 7
अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार असून, या मालिकेचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही.

4 / 7
टीम इंडियासमोर यानंतर आशिया चषकाचे आव्हान असणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया कपचे वेळापत्रकही निश्चित नाही. मात्र आशिया चषक सप्टेंबरमध्ये होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

5 / 7
आशिया कपनंतर ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा भारतात येणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत.

6 / 7
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे आणि 10 संघांमध्ये 2 महिने क्रिकेटची लढाई होणार आहे.

7 / 7
वर्ल्डकपनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. यानंतर टीम इंडिया डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. म्हणजे पुढील सहा महिन्यांत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बहुतांश सामने खेळणार आहे.