IPL Media Rights : 2017मध्ये काय झालं? मीडिया अधिकारांचा इतिहास काय आहे? जाणून घ्या…

| Updated on: Jun 12, 2022 | 9:34 AM

सोनीने प्रथम त्याच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले.

IPL Media Rights : 2017मध्ये काय झालं? मीडिया अधिकारांचा इतिहास काय आहे? जाणून घ्या...
IPL
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : बीसीसीआय (BCCI) 2023 ते 2027 या हंगामासाठी आयपीएल मीडिया हक्कांचा (IPL Media Rights) लिलाव आज सुरू होणार आहे.  आज मीडिया हक्क विकणार आहे. या शर्यतीमध्य Viacom18 (Reliance), Disney, Zee, Times Internet, SuperSport, FunAsia आणि Sony Group या शर्यतीत कायम आहेत. दरम्यान, शुक्रवारी अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या कंपनी Amazonनं मीडिया हक्कांच्या लिलावाच्या दोन दिवस आधी आपलं नाव मागे घेतलंय. मुकेश अंबानींची रिलायन्स यावेळी मीडिया हक्क जिंकू शकते, असं बोललं जातंय.  ही प्रक्रिया दोन-तीन दिवस किंवा त्याहूनही अधिक काळ चालू राहू शकते. मुंबईत (Mumbai) आयोजित करण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू होईल. दरम्यान, या लिलावांचा थोडा इतिहास बघूया. यापूर्वी कुणाला मीडिया हक्क विकल्या गेलेत. त्यावर आता काय चर्चा केली जातेय, याविषयी आपण आज बोलूया

2017 मध्ये काय झालं?

सप्टेंबर 2017 मध्ये Star Indiaने 16 हजार 347.50 कोटी रुपयांची बोली लावून 2017 ते 2022 या कालावधीसाठी मीडिया हक्क विकत घेतले होते. त्यांनी सोनी पिक्चर्सचा पराभव केला. या करारानंतर आयपीएल सामन्याची किंमत जवळपास 55 कोटी रुपयांवर गेली होती. 2008 मध्ये, सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने 8,200 कोटी रुपयांच्या बोलीवर 10 वर्षांसाठी मीडिया हक्क जिंकले. तीन वर्षांच्या कालावधीसाठी IPL चे जागतिक डिजिटल अधिकार नोव्ही डिजिटलला 2015 मध्ये ₹302.2 कोटींमध्ये देण्यात आले होते.

मीडिया अधिकारांचा इतिहास काय आहे?

आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. सोनीने प्रथम त्याच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले. 2008 ते 2017 पर्यंत 8,200 कोटी रुपयांना मीडिया अधिकार मिळवले होते. तेव्हा ऑनलाइन प्रक्षेपण नव्हते. यानंतर बीसीसीआयने 2018 मध्ये मीडिया हक्कांसाठीचे अधिकार पुन्हा विकले. यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने सोनीचा पराभव केला.

हे सुद्धा वाचा

प्रसारमाध्यमांच्या हक्कांवर चर्चा

बीसीसीआयला मीडिया हक्कांद्वारे ४५ ते ५० हजार कोटी रुपये मिळू शकतात. आयपीएलच्या कमाईतील 70 टक्के रक्कम बोर्डाला येथून मिळते. विशेष म्हणजे त्याला या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. कारण आयकराच्या कलम 12A अंतर्गत बीसीसीआयला आयपीएलच्या कमाईवर कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. देशभरात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हे करण्यात आले आहे.

चार पॅकेजेस काय आहेत?

यापूर्वी मीडियाचे हक्क एकत्र विकले जात होते. टीव्हीपासून ते डिजिटल अधिकारही त्यात होते. बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की एकाच पॅकेजऐवजी चार स्वतंत्र पॅकेजमध्ये हक्क विकले जातील. त्यामुळे फायदा होऊ शकेल.