मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडिअन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये 69 वा सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणारल आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईला हा सामना फक्त जिंकायचा नाहीतर मोठ्या फरकावे जिंकावा लागणार आहे. आजच्या सामन्यात मुंबई आणि हैदराबादच्या या खेळाडूंवर सर्वांची नजर असणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परंतु हैदराबाद संघ हंगामातील शेवटच्या सामन्यात विजय मिळणवण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार आहे.
मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हे पर्व अजिबात चांगलं गेलं नाही. रोहितला आतापर्यंत 13 डावात 19.77 च्या सरासरीने केवळ 257 धावा करता आल्या. रोहितने फक्त 1 अर्धशतक खेळी केली आहे. या सामन्याचे महत्त्व पाहता रोहितच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अभिषेक शर्माने आपल्या मोजक्या खेळींनी सर्वांना नक्कीच प्रभावित केले आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. अभिषेककडून या मोसमात आतापर्यंत अभिषेकने 11 डावात 20.55 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत.
या मोसमात पहिल्या 3 डावात सूर्यकुमार यादवची बॅट पूर्णपणे शांत दिसली. यानंतर सुर्याने शानदार पुनरागमन करत आतापर्यंतच्या मोसमात 13 डावांत 40.50 च्या सरासरीने 486 धावा केल्या आहेत. सूर्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहता या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
जरी हा मोसम हैदराबाद संघासाठी चांगला नव्हता. मात्र संघाच्या यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. या मोसमात 10 डावात फलंदाजी करताना क्लासेनने आतापर्यंत 53.75 च्या सरासरीने 430 धावा केल्या आहेत. क्लासेनने 180 च्या स्ट्राइक रेटने ही धावा काढल्या आहेत.
अनुभवी लेगस्पिनर पियुष चावला याने यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. पियुष चावलाने विकेट घेण्याबत अनेक सामन्यांमध्ये संघाला पुनरागमन करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजच्या सामन्यात पियुष चावलाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.