आयपीएल हा फलंदाजांना खऱ्या अर्थाने पूरक असा खेळ आहे. इथे गोलंदाजांची काही खैर नसते. चेंडू रडारमध्ये आला की थेट सीमेपार पाठवला जातो. त्यामुळे या स्पर्धेत खोऱ्याने धावा होतात. फलंदाज कमी चेंडूत शतक, अर्धशतकं झळकावून आपली छाप सोडतात. पण गेल्या काही दिवसांपासून ऑरेंज कॅपची ही शर्यत एकतर्फी असल्याचं दिसून आलं आहे. विराट कोहलीचा पाठलाग करणं फलंदाजांना अशक्यप्राय होताना दिसत आहे. एखादा फलंदाज जवळपास पोहोचला की पोहोचला की विराट पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारून ही दरी आणखी वाढवतो. त्यामुळे विराट कोहली या शर्यतीत आघाडीवर आहे. विराट कोहलीने 10 सामन्यात 500 धावांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे त्याच्या जवळपास पोहोचयचं असल्यास उर्वरित चार सामन्यात कमी धावांवर बाद होणं हेच फायद्याचं ठरू शकतं. अन्यथा शेवटपर्यंत ऑरेंज कॅपचा साज विराट कोहलीच्या डोक्यावर राहील.
विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. त्याने 9 सामन्यात 149.49 च्या स्ट्राईक रेटने 447 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात 53 धावांचं अंतर आहे. हे अंतर टी20 मध्ये बरंच मोठं आहे. त्यामुळे हे अंतर गाठण्यासाठी ऋतुराजला विशेष मेहनत घ्यावी लागेल. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 418 धावांसह तिसऱ्या, ऋषभ पंत 398 धावांसह चौथ्या आणि कोलकाता नाईट रायडर्सचा फिल सॉल्ट 392 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला 7 विकेट्स राखून पराभूत केलं. या विजयामुळे 2 गुणांची भर पडत कोलकात्याचे 12 गुण झाले आहेत. कोलकात्याचा संघ दुसऱ्या स्थानावर असून आणखी दोन विजय मिळवताच प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. या सामन्यात कोलकात्याच्या फिलिप सॉल्टने 33 चेंडूत 68 धावा केल्या. त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. या खेळीमुळे सॉल्टने टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद.