आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 51 वा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरच्या गोलंदाजांनी या आव्हानाचा शानदार बचाव केला. गुजरातने मुंबईला 18.5 ओव्हमध्ये 145 धावांवर गुंडाळलं. कोलकाताचा हा या हंगामातील सातवा विजय ठरला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. या सामन्याचा ऑरेंज कॅप शर्यतीतील पहिल्या 5 पाचातील फलंदाजांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. या सामन्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्याकडे ऑरेंज कॅप कायम आहे. एका मोसमात सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप मिळते.
ऑरेंज कॅपच्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये 5 वेगवेगळ्या संघाचे फलंदाज आहे. या पाचही फलंदाजांनी प्रत्येकी 10 सामने खेळले आहेत. पहिल्या 5 फलंदाजांपैकी दोघे हे स्वत: कॅप्टन आहेत. यामध्ये ऋतुराज आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याचा समावेश आहे. ऋतुराज पहिल्या आणि केएल पाचव्या स्थानी आहे. तर विराट, साई सुदर्श आणि रियान पराग हे तिघे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी विराजमान आहेत. विराट आणि ऋतुराज यांच्यातील ऑरेंज कॅपमधील फरक हा अवघ्या 9 धावांचा फरक आहे.
ऋतुराजच्या नावावर 509 धावा आहेत. तर विराट कोहलीच्या नावे 500 धावांची नोंद आहे. साई सुदर्शन याने 418 धावा केल्या आहेत. रियान पराग 409 धावांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. तर केएल राहुलने 10 सामन्यात 406 धावा केल्या आहेत. आता शनिवारी 4 मे रोजी आरसीबी विरुद्ध गुजरात असा सामना आहे. त्या सामन्यात विराटला 10 धावा करुन ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.