रॉयल चॅलेंजर्सचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 58 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 47 बॉलमध्ये 195.74 स्ट्राईक रेटने 6 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी केली. विराटचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. मात्र त्याने या हंगामात 600 पेक्षा अधिक धावांचा टप्पा पार केला. विराट या हंगामात 600 धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला. विराट यासह आयपीएलच्या इतिहास 4 वेळा 600 पेक्षा अधिक धावा करणारा केएल राहुल याच्यानंतर दुसराच फलंदाज ठरला. विराटने 92 धावांच्या खेळीसह ऑरेंज कॅपही कायम राखण्यात यश मिळवलं.
विराटने 92 धावांच्या खेळीसह ऑरेंज कॅपवरील पकड आणखी मजबूत केली. या हंगामातील 57 व्या सामन्यानंतर विराट आणि ऋतुराज गायकवाड या दोघांमध्ये ऑरेंज कॅपचं अंतर हे अवघ्या 1 धावेचं होतं. मात्र विराटने 92 धावा करत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. तसेच ऑरेंज कॅपवर घट्ट पकड मिळवली. आता विराटच्या आसपासही कुणीही नाही. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटचा अपवाद वगळता टॉप 5 मध्ये कोण आहे? हे जाणून घेऊयात.
विराटने आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 153.51 स्ट्राईक रेट आणि 70.44 च्या एव्हरेजने एकूण 634 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराजने 11 सामन्यांमध्ये 541 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी सनरायजर्स हैदराबादचा घातक फलंदाज ट्रेव्हिसस हेड आहे. हेडच्या नावावर 11 सामन्यात 533 धावा आहेत. चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आहे. संजूने 11 सामन्यात 471 धावा केल्या आहेत. तर पाचव्या स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनीलन नरेन याने 11 मॅचमध्ये 461 रन्स केल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटीकपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि विद्वत कवेरप्पा.