विराट कोहली याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कॅप्टन फाफ डु प्लेसीस याच्यासह 78 धावांची सलामी भागीदारी केली. विराटने या भागीदारी दरम्यान वादळी खेळी केली. विराटचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. मात्र विराट कोहली याने या खेळीसह मोठा विक्रम केला आहे. मानाच्या ऑरेंज कॅपवरचा दावा आणखी मजबूत केला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटनंतरच्या टॉप 3 मधील फलंदाज हे रनमशीनच्या आसपासही नाहीत. त्यामुळे विराटला ऑरेंज कॅप विजेता होण्याची किंवा त्यावर आणखी काही दिवस दबदबा कायम राखण्याची संधी आहे.
विराटने चेन्नई विरुद्ध 29 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 162.07 च्या स्ट्राईक रेटने 47 धावा केल्या. विराट यासह या हंगामात 700 पेक्षा अधिक धावा करणार पहिला फलंदाज ठरला. विराटच्या नावावर आता 14 सामन्यानंतर 708 धावा झाल्या आहेत. विराटने 64.36 च्या सरासरीने आणि 155.60 स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने या धावा केल्या आहेत. तसेच चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याच्याकडे या सामन्यात धावा करुन विराटच्या जवळ पोहचण्याची संधी होती. मात्र ऋतुराजने झिरोवर आऊट होत ती संधी गमावली.
ऋतुराच्या नावावर 14 सामन्यांमधील 13 डावांमध्ये 4 अर्धशतक आणि 1 शतकासह 583 धावा आहेत. तिसऱ्या स्थानी सनरायजर्स हैदराबादचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड आहे. हेडने 11 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने आणि 201.89 च्या तुफान स्ट्राईक रेटने 533 धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान पराग आहे. रियानने 13 सामन्यात 4 अर्धशतकांच्या मदतीने 531 धावा केल्या आहेत. हेड आणि रियान या दोघांमध्ये अवघ्या 2 धावांचा फरक आहे. तर पाचव्या स्थानी गुजरातचा साई सुदर्शन आहे.
गुजरातचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपची खरी लढत पहिल्या 4 फलंदाजांमध्येच आहे. त्यातही विराटच्या जवळ जाण्यासाठी कोणत्याही फलंदाजाला मोठ्या खेळीची गरज असणार आहे. त्यामुळे विराटला ऑरेंज कॅप आपल्याकडे कायम राखण्याची सुवर्णसंधी आहे. आता विराटकडे ही कॅप कायम राहणार की दुसरा कुणी ती पटकवणार, हे पाहणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे.
विराटचा दबदबा कायम
Virat Kohli finished the league stage with 708 runs @ 64 average with 156 Strike Rate.
He still holds the Orange Cap and has the most sixes in the tournament. pic.twitter.com/Ils9D888jz
— Aditya Saha (@Adityakrsaha) May 18, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.