आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅप गेल्या कित्येक सामन्यांपासून विराट कोहलीच्या डोक्यावर आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खेळाडूंची जोरदार धडपड सुरु आहे. मात्र पोहोचता आलं नाही. खरं तर राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यात ही संधी रियान पराग आणि संजू सॅमसनकडे होती. मात्र दोघंही स्वस्ता बाद झाल्याने त्याना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. संजू सॅमसन 14 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर रियान पराग 18 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्यानेही एक चौकार आणि एक षटकार मारला. विराट कोहली सहा सामन्यात 319 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. तर रियान पराग 284 धावांसह दुसऱ्या स्थानावर, संजू सॅमसन 264 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांना उलथापालथ करण्याची संधी आहे. मात्र यासाठी मोठी खेळी करावी लागणार आहे. शुबमन गिलला 70 धावांची खेळी करावी लागेल. तर साई सुदर्शनला शतक ठोकवं लागेल. त्यामुळे या सामन्यातही विराट कोहलीच्या डोक्यावरील ऑरेंज कॅप खेचून घेणं शक्य होणार नाही. विराट कोहली पुढच्या सामन्यातही फेल ठरला तर मात्र ही लढाई चुरशीची होईल. मात्र विराट कोहलीचा फॉर्म पाहता अर्धशतकी खेळी केली तर मात्र ऑरेंज कॅपचं स्वप्न विसरावं लागेल.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात अतितटीचा सामना झाला. हा सामना पंजाब किंग्सने 3 विकेट्ने गमावला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 19.5 षटकात 7 गडी गमवून पूर्म केलं. या सामन्यासाठी शिम्रॉन हेटमायर याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.