मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीचा सीएसकेने 27 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह चेन्नईने पॉइंट टेबलमध्ये आपलं स्थान आणखी भक्कम केलं आहे. चेन्नईने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. 15 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवून थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
प्रथम फलंदाजी करताना 167 धावा केल्या होत्या. चेन्नई कडून शिवम दुबे याने सर्वाधिक 25 धावा करत संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली होती. त्यासोबतच महेंद्रसिंग धोनी याने शेवटी येत दोन षटकार आणि एक चौकार मारत संघाला 150 आकडा पार करून दिला होता.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ या लक्षाचा पाठलाग करताना त्यांची सुरुवात एकदम खराब झालेली. संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला दीपक चहर याने 0 वर माघारी पाठवलं. दिल्लीकडून रुसो याने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट केलेल्या मनीष पांडेने सुद्धा 27 धावांची खेळी केली. शेवटला अक्षर पटेलनेही 12 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 21 धावा जोडल्या होत्या. मात्र तो संघाला विजयापर्यंत पोहोचू शकला नाही. अखेर दिल्ली कॅपिटल्सचा सीएसकेने 27 धावांनी पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्स : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, तुषार देशपांडे, दीपक चाहर, महेश तीक्षणा, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, रिले रोस्सो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), अमन हाकिम खान