मुंबई : दिल्ली कॅपिटल्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्यात हैदराबाद संघाने 9 धावांनी विजय मिळवला आहे. दोन्ही संघ चार गुणांसह तळाशी होत, मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवामुळे आता गुणतालिकेमध्ये बदल झाला आहे. दोन्ही संघ तळाला होते त्यामुळे इतर काही बदल झाला नसून हैदराबाद संघाने 2 गुण मिळवत एकूण 6 गुण पटकावले आहेत. मुंबई इंडिअन्सला याचा फटका बसलेला आहे. आठव्या स्थानावरून नऊव्या स्थानावर घसरण झाली आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 197 धावा केल्या आणि विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. पण दिल्लीचं संघ 6 गडी गमवून 188 धावा करू शकला. दिल्लीचा धावांनी पराभव झाला. या पराभवासह दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेतील 40 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला. हा सामना हैदराबादने 9 धावांनी जिंकला. या स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा होता. पण दिल्लीचा पराभव झाल्याने या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, अब्दुल समद, अकेल होसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक