मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणार आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं हळूहळू चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. कारण प्लेऑफसाठी सात संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. गुजरातने राजस्थानवर 9 गडी आणि 37 चेंडू राखून विजय मिळवला. यामुळे गुजरातच्या खात्यात दोन गुणांची कमाई झाली आहे. तसेच गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.
गुजरातने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत प्लेऑफमधला मार्ग सुकर झाला आहे. गुजरात संघ 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आता गुजरातने चार पैकी दोन सामने जिंकले की प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.तर राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावरच आहे. मात्र राजस्थानच्या नेट रनरेटवर जबरदस्त फरक पडला आहे. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जर तरची लढाई असणार आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
गुजरातचा संघ 14 गुण आणि +0.752 रनरेटसह अव्वल स्थानी, लखनऊ 11 गुण आणि 0.639 रनरेटसह दुसऱ्या, चेन्नई 11 गुण आणि 0.329 रनरेटसह तिसऱ्या, राजस्थान 10 गुण आणि 0.448 रनरेटसह चौथ्या, बंगळुरु 10 गुण आणि -0.030 रनरेटसह पाचव्या, मुंबई 10 गुण आणि-0.373 रनरेटसह सहाव्या, पंजाब किंग्स 10 गुण आणि -0.472 रनरेटसह सातव्या, कोलकाता 8 गुण आणि -0.103 रनरेटसह आठव्या, हैदराबाद 6 गुण आणि -0.540 रनरेटसह नवव्या, तर दिल्ली 6 गुण आणि -0.768 रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.
राजस्थान रॉयल्सनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण राजस्थानचा हा निर्णय चुकीचा ठरला. 17.5 षटकात सर्वबाद 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं. गुजरातने हे आव्हान 13.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/ विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल