IPL 2023 Points Table | आता काही खरं नाही, पॉइंट टेबलमध्ये एक-दोन नाहीतर पाच संघांचे… नेमकं काय झालंय!

| Updated on: May 09, 2023 | 12:42 AM

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : पॉइंट टेबलमध्ये फुल ट्राफिक जाम झालेलं आहे. पाच संघांचे 10 गुण झाले असून आता प्ले- ऑफसाठी अनेक संघ जर तरच्या गणितावर असणार आहेत.

IPL 2023 Points Table | आता काही खरं नाही, पॉइंट टेबलमध्ये एक-दोन नाहीतर पाच संघांचे... नेमकं काय झालंय!
Follow us on

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील झालेल्या रोमांचक सामन्यामध्ये केकेआर संघाने विजय मिळवला आहे. रिंकू सिंह याने 1 बॉलमध्ये 2 धावांची गरज असताना चौकार मारत परत एकदा तो विजयाचा हिरो ठरला आहे. या विजयाह केकेआरचे पॉइंट टेबलमध्ये दहा गुण झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता पॉइंट टेबलमध्ये पाच संघांचे 10 गुण झाले असून आता प्ले ऑफचा मार्ग आणखी खडतर होणार आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

कोलकाता संघाने आजच्या सामन्यातील विजयासह पॉइंट टेबलमध्ये मुसंडी मारली आहे. थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स 16 संघांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी सीएसके 13 गुणांसह, तिसऱ्या स्थानी लखनऊ संघ 11 गुणांसह त्यानंतर सर्व ट्राफिक जाम झालेलं दिसत आहे. पॉइंट टेबल्स राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ अनुक्रमे 10 दहा गुणांसह आहेत. पंजाब किंग्जला आजच्या सामन्यात विजय मिळवत थेट 3 नंबरला जायची संधी होती.

सामन्याचा धावता आढावा 

केकेआरला शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. रिंकूने या शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला. रिंकू अशा प्रकारे पुन्हा एकदा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्या पूर्ण केलं. रिंकूने 10 बॉलमध्ये नॉट आऊट 21  धावा केल्या.

पंजाब किंग्स प्लेंइग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभासिमरन सिंग, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, रिशी धवन राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), वेंकटेश अय्यर, आर गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वैभव अरोरा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.