मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील दोन सामने शनिवारी पार पडले. या सामन्यामुळे गुणतालिकेचं गणित आणखी किचकट झालं आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्सने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे दिल्लीला दोन गुणांचा फायदा झाला असून एका अंकाने वर येत नववं स्थान पटकावलं आहे. तर मुंबई आणि बंगळुरुचं स्थान पराभवामुळे तसंच आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित आणखी किचकट झालं आहे. आता दिल्लीला सुद्धा प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे.
गुजरातचा संघ 14 गुण आणि +0.752 रनरेटसह अव्वल स्थानी, चेन्नई 13 गुण आणि +0.409 रनरेटसह दुसऱ्या, लखनऊ 11 गुण आणि 0.639 रनरेटसह तिसऱ्या, राजस्थान 10 गुण आणि 0.448 रनरेटसह चौथ्या, बंगळुरु 10 गुण आणि -0.209 रनरेटसह पाचव्या, मुंबई 10 गुण आणि -0.454 रनरेटसह सहाव्या, पंजाब किंग्स 10 गुण आणि -0.472 रनरेटसह सातव्या, कोलकाता 8 गुण आणि -0.103 रनरेटसह आठव्या, दिल्ली 8 गुण आणि -0.529 रनरेटसह नवव्या स्थानी, तर हैदराबाद 6 गुण आणि -0.540 रनरेटसह दहाव्या आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात एकदम खराब झाली. त्यामुळे संघावर पॉवरप्लेमध्ये दबाव आला. मुंबईने 20 षटकात 8 गडी गमवून 139 धावा केल्या आणि विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं.चेन्नईने हे आव्हान 17.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं.ऋतुराज गायकवाडने 30, डेव्हॉन कॉनव्हेनं 44, अजिंक्य रहाणेनं 21, अंबाती रायडूने 12 धावा केल्या. तर शिवम दुबे नाबाद 26 धावांवर राहीला.
मुंबईची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, आकाश मधवाल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना
बंगळुरुने 20 षटकात 4 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीने हे आव्हान 16.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दिल्लीने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केलं आहे. बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि डेविड वॉर्नरने आक्रमक खेळी केली. चांगल्या खेळीमुळे दिल्लीचा विजय सोपा झाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.