मुंबई : आयपीएलमधील 57 व्या मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स या संघांमधील सामन्यामध्ये मुंबई संघाने विजय मिळवला आहे. स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने केलेल्या शतकाच्या जोरावर मुंबई संघाने पहिल्यांदा बॅटींग करताना 218 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाला काही यश आलं नाही. गुजराते 20 षटकात 191 धावा केल्या आणि मुंबईने महत्त्वाच्या सामन्यामध्ये 27 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह पलटणने प्ले ऑफधील आपलं स्थान पक्क करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
मुंबई इंडिअन्सन संघाने या विजयासह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईला आता प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन विजय मिळवणं गरजेचं आहे. मात्र आतासुद्धा सर्व काही गणित स्पष्ट झालेली नाहीत. गुजरात 16 गुण आणि प्लस 0. 761 रनरेटसह पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या स्थानी 15 गुणांसह +0.493 च्या रनरेटने सीएसके आहे. मुंबई आता तिसऱ्या स्थानी आली असून मुंबईचे 14 गुण झाले आहेत. चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह आहे.
पाचव्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स 11 गुणांसह आहे. सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी अनुक्रने आरसीबी, केकेआर आणि पंजाब हे संघ 10 गुणांसह आहेत. त्यामुळे आता शेवटचे दोन-चार सामने सर्व संघांसाठी फक्त जिंकणं नाहीतर रनरेटकडेही लक्ष देऊन खेळावे लागणार आहेत.
सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यासोबतच ईशान किशन 30 आणि रोहित शर्माने 29 धावा केल्या. गुजरातच्या राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आणि 79 धावांची नाबाद खेळीसुद्धा केली.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय