IPL 2023 Points Table | अरे उगाच नाही पाच जिंकले, मुंबईची पॉइंट टेबलमध्ये मुसंडी, पाहिलंत का?

| Updated on: May 10, 2023 | 12:26 AM

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने पॉइंट टेबलमध्ये गगनभरारी घेतलेली पाहायला मिळत आहे.

IPL 2023 Points Table | अरे उगाच नाही पाच जिंकले, मुंबईची पॉइंट टेबलमध्ये मुसंडी, पाहिलंत का?
Follow us on

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने पॉइंट टेबलमध्ये गगनभरारी घेतलेली पाहायला मिळत आहे. आठव्या स्थानावरून मुंबई आता थेट टॉप 3 मध्ये आली आहे. आरसीबी संघावर मुंबईने 6 गडी आणि 21 चेंडू राखून विजय मिळवला आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

आजच्या सामन्यातील विजयासह मुंबई संघाने थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स 16 संघांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी सीएसके 13 गुणांसह, तिसऱ्या स्थानी 12 गुणांसह मुंबई इंडिअन्स, चौथ्या स्थानी लखनऊ संघ 11 गुणांसह तर त्यानंतर राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, आरसीबी आणि पंजाब किंग्स हे संघ अनुक्रमे 10 गुणांसह आहेत.

सामन्याचा धावता आढावा

मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई संघाने हा सामना जिंकला आहे. आरसीबी संघाने मुंबईला 200 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. त्यासोबतच नेहल वढेरा याने नाबाद 52 धावांची खेळी करत विनिंग शॉट मारत संघाला विजय मिळवून दिला. मुंबई संघाने हे आव्हान 6 विकेट्स आणि 21 चेंडू राखून विजय मिळवला.

ग्लेन मॅक्सवेल याने 68 धावांची खेळी केली यामध्ये त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तर फाफ ने 41 चेंडूत 65 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. दोघे बाद झाल्यावर खेळायला आलेल्या दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांनी संघाला 199 पर्यंत पोहोचवलं होतं.

आरसीबीने 200 धावांचं लक्ष्य दिलं खरं पण सूर्या नावाच्या वादळाने 200 धावा अपुऱ्या पडल्या. इशान किशनच्या 42 धावांनी विजयाचा पाय रचला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी आरसीबीच्या तोंडाला पानं पुसलीत.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड