मुंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने पाच धावांनी विजय मिळवलेला आहे. या अटीतटीच्या सामन्यात केकेआरचा पराभव होईल असं सर्वांना वाटत होतं कारण हैदराबाद संघ मजबूत स्थितीत होता. मात्र बॉलरने केलेल्या कमाल कामगिरीच्या जोरावर हा सामना केकेआरने आपल्या पारड्यात झुकवला. आजच्या विजयासह केकेआर संघाने 2 गुणांची कमाई केली आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
केकेआर संघाने आजच्या विजयासह दोन गुणांची कमाई केली. मात्र ते पॉइंट टेबल मध्ये आहे त्याच स्थानावर आहेत. केकेआरचे आता 8 गुण झाले असून ते पॉइंट टेबल्स मध्ये आठव्या स्थानावर आहेत. तर हैदराबाद संघ पराभव झाल्यामुळे 9 व्या स्थानावर कायम आहे.
केकेआर संघाने प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघासमोर 172 धावांचं लक्ष ठेवलेलं होतं. मात्र हैदराबाद संघाला 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआर संघाकडून रिंकू सिंग याने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर त्यासोबतच नितिश राणाने सुद्धा 42 धावांची महत्त्वाची खेळी केली. तर शेवटला येत अनुकूल रॉय याने सात चेंडूंमध्ये 13 धावा करत संघाला 170 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
केकेआर संघाने दिलेल्या लक्ष्याच पाठलाग करताना हैदराबाद संघाने सावध सुरुवात केली होती. मात्र आज सुद्धा मयंक अग्रवाल अपयशी ठरला. त्यासोबतच अभिषेक शर्मा हा सुद्धा 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाकडून कर्णधार मारक्रमने 41 धावांची तर क्लासेसने 36 धावा करत संघाला विजयाच्या वाटेवर आणलं होतं.
दोघेही बाद झाल्यावर संघ कुठेतरी विजयापासून वंचित राहिला. कारण त्यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात आलं नाही. केकेआरचा स्पिनर वरून चक्रवर्तीने शेवटची ओव्हर टाकत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.