मुंबई : सीएसके संघाने हैदराबादवर सात विकेट्सने विजय मिळवलेला आहे. या विजयासह दोन गुणांची कमाई करत आपलं पॉइंट टेबलमधील स्थानही आणखी भक्कम केलं आहे. मात्र आता पॉइंट टेबलमध्ये पहिल्या तीन संघाचे गुण आणि त्याखालोखाल असलेल्या संघाचे गुण हे समान आहेत. त्यामुळे आता रस्सीखेच पाहायला मिळणार असून यामध्ये रनरेट महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये शेवटला क्वालिफाय होण्यासाठी सामन्यांचे निकालावर काही संघांची एन्ट्री ठरणार आहे.
पॉइंट टेबलमध्ये पाहिलं तर आता पहिल्या स्थानावर राजस्थान रॉयल्स हा संघ आहे. तर दुसऱ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्स आणि तिसऱ्या स्थानावर आता चेन्नई सुपर किंग्सने उडी घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही संघांचे गुण आठ आहेत.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
यानंतर चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या या स्थानावर गुजरात, आरसीबी, मुंबई आणि पंजाब अनुक्रमे हे संघ आहेत. या चारही संघांचे गुण हे 6 आहेत. आठव्या स्थानावर केकेआर, नवव्या स्थानी हैदराबाद हे संघ 4 गुणांसह आहेत. तळाला दिल्ली कॅपिटल्स संघ 2 गुणांसह आहे. त्यामुळे आता क्वालिफाय करण्यासाठी सामने जिंकण्यासोबतच रन रेटवरही लक्ष ठेवता आलं पाहजे. नाहीतर गुण समान आहेत आणि फक्त रन रेट कमी असल्यामुळे क्वालिफाय होता आलं नाही, असं झालं तर नवल वाटायला नको.
प्रथम फलंदाजी करताना सनराइजर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकात 134 धावा केल्या आहेत. हैदराबादच्या संघाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर जडेजाने चेन्नईकडून 3 विकेट्स घेतल्या.
हैदराबाद संघाच्या 135 धावांचा पाठलाग करताना सीएसकेने 3 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण केलं. एकतर्फी सामन्यामध्ये डेव्हॉन कॉनवे याने सर्वाधिक नाबाद 77 धावांची खेळी केली. त्यासोबतच ऋतुराज गायकवाड यानेही 35 धावा केल्या. हैदराबादच्या मयंक मार्कंडे याने घेतलेल्या 2 विकेट्स सोडता इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळवता आलं नाही.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक