मुंबई : आरसीबी आणि दिल्लीच्या विजयानंतर पॉइंट टेबल मध्ये उलटफेअर झालेला पाहायला मिळत आहे. कारण मुंबई इंडिअन्सला याचा मोठा फटका बसलेला दिसत आहे. कारण आता अनेक संघांचे गुण हे 6 झालेले पाहायला मिळत आहे त्यामुळे रनरेटच्या आधारावर आता संघ आपली जागा मजबूत करणार आहेत.
आरसीबी संघाने पंजाबवर विजय मिळवत गुणतालिकेमध्ये सरशी साधली आहे. आरसीबी आता पाचव्या स्थानावर असून मुंबई इंडियन्सला फटका बसला आहे. मुंबई सहाव्या स्थानावर फेकली गेली आहे. केकेआर संघाचा दिल्लीने पराभव केल्यामुळे केकेआर संघ आठव्या स्थानावरच चार गुणांसह आहे. त्यानंतर हैदराबाद ही 4 गुणांसह नवव्या स्थानी आहे. तर दिल्लीने केकेआरचा पराभव करत यंदाचा आपला सीजन मधला पहिला विजय मिळवत गुणांचं खातं उघडलं आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
सामन्याचा धावता आाढावा
दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. केकेआरने दिल्ली कॅपिट्ल्सच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 127 धावा केल्या. केकेआरकडून ओपनर जेसन रॉय याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेल याने 38 धावांचं योगदान दिलं. मनदीप सिंह याने 12 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वरुण चक्रवर्ती याने नाबाद 1 रन केला.
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2023 मध्ये पहिलावहिला विजय मिळवला आहे. मात्र दिल्लीला हा विजयही सहजासहजी मिळाला नाही. दिल्लीला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या या सामन्यात 4 चेंडू राखून विजय मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्वल्सला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्याने हे सोपं आव्हान अवघड झालं. तसेच केकेआरच्या गोलंदाजांनीही कडक बॉलिंग करत सहजासहजी हार मानली नाही. दिल्लीने 128 धावांचं विजयी आव्हान 19.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.