मुंबई : आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यामुळे संपूर्ण गुणतालिकेचं गणितच बदललं आहे. गुजरातने लखनऊला 7 धावांनी पराभूत केलं. तर पंजाबने मुंबईला 13 धावांनी पराभवाची धूळ चारली. यामुळे गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. त्यामुळे प्रत्येक संघाच्या उर्वरित सात ते आठ सामन्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. कारण हा टप्पा निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे टॉप चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी पहिल्या आठ संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.
मुंबई इंडियन्सला टॉप 4 मध्ये येण्यासाठी आठ पैकी 5 सामने जिंकावे लागणार आहेत. अशीच संधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला देखील आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स, लखनऊ, चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरातने उर्वरित सामन्यांपैकी एखाद दोन सामने सोडून इतर सामने जिंकले तर मात्र मुंबई इंडियन्स आणि बंगळुरुचं काही खरं नाही.
गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या स्थानी, लखनऊ दुसऱ्या, चेन्नई तिसऱ्या, गुजरात चौथ्या, पंजाब पाचव्या, बंगळुरु सहाव्या, मुंबई सातव्या, कोलकाता आठव्या, हैदराबाद नवव्या आणि दिल्ली दहाव्या स्थानी आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
लखनऊ विरुद्धच्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकात 6 गडी गमवून 135 धावा केल्या आणि विजयासाठी 136 धावांचं आव्हान दिलं. लखनऊच्या संघाला 20 षटकात 7 गडी गमवून 128 धावा करता आल्या. गुजरातने हा सामना 7 धावांनी जिंकला.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (C), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा
लखनई सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, आवेश खान, रवी बिश्नोई
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईला चांगलाच महागात पडला. पंजाबने 20 षटकात 8 गडी गमवून 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. मुंबईच्या संघाला 20 षटकात 6 गडी गमवून 201 धावा करता आल्या. मुंबईचा 13 धावांनी पराभव झाला.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान (क), जितेश शर्मा (डब्ल्यू), हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.